रिक्षावाल्यांसोबत जेवली;कोट्यावधींचे कर्ज,रात्री रस्त्यावर राहण्याची वेळ; प्रसिद्ध अभिनेत्री कर्जात बुडाली
एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काही घडलं की ती कर्जबाजारी झाली. तिच्यावर रात्री स्त्यावर कारमध्ये राहण्याची वेळ आली. एवढच नाही तर घरच्यांनीही तिची साथ दिली नाही. या अभिनेत्रीने एखा मुलाखतीत आपली सर्व व्यथा मांडली आहे.

यशाच्या शिखराव असतानाही बॉलिवूडमध्ये किंवा टिव्ही इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच अभिनेत्री आणि अभिनेत्यांना खडतड प्रवास करावा लागत असतो. पण पडद्यावर दिसणाऱ्या त्यांच्या ग्लॅमरस दुनियेमागे त्यांच्या खऱ्या आयुष्याचा अंदाज लावणं जरा कठीणचं असतं. त्यांच्या खऱ्या आयुष्यात ते कोणत्या परिस्थितीतून जात असतात याची कल्पनाही आपल्याला नसते.
एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातही असच काहीस घडलं आहे. एका लोकप्रिय हिंदी मालिकेतून मिळालेली प्रसिद्ध तिला चित्रपटांपर्यंत घेऊन गेली. पण कधी काय घडेल काही सांगता येत नाही असच झालं आणि या अभिनेत्रीचा एक शो अचानक बंद झाल्याने ती कर्जबाजारी झाली. तिच्यावर रात्री स्त्यावर कारमध्ये राहण्याची वेळ आली.
टीव्ही शो संपला अन् रस्त्यावर राहण्याची वेळ
ही अभिनेत्री आहे रश्मी देसाई. रश्मीने तिच्या आयुष्यात अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानांचा सामना केला आहे. ‘उतरन’मधून लोकप्रिय झालेल्या रश्मीला बऱ्याच गोष्टींबद्दल संघर्ष करावा लागला. रश्मीने मुलाखतीत सांगितलं की जेव्हा तिचा टीव्ही शो संपला तेव्हा तिचं आयुष्यच ठप्प झालं होतं. कारण तिच्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज होतं.
आपल्या याच संघर्षाबद्दल रश्मीने मुलाखतीत सर्व खुलासे केले आहेत. ती म्हणाली,”मी एक घर विकत घेतलं होतं आणि माझ्यावर 2.5 कोटी रुपयांचं कर्ज होतं. त्याशिवाय मला आठवतं की माझ्यावर एकूण 3.25 ते 3.50 कोटी रुपयांचं कर्ज होतं. मला वाटलं सर्व काही ठीक आहे, सामान्य आहे. पण अचानक माझा शो बंद झाला. त्यानंतर मला काय करावं समजत नव्हत, अखेर मी चार दिवस रस्त्यावर राहिले. माझ्याकडे एक Audi A6 होती ज्यामध्ये मी झोपायचे. मी माझं सामान मॅनेजरच्या घरी ठेवलेलं आणि कुटुंबापासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं” असं तिने सांगितलं.
रिक्षावाल्यांसोबत जेवण केलं
रश्मी देसाईने याच दरम्यानचा एक कठीण प्रसंग देखील सांगितला जेव्हा तिला रिक्षावाल्यांसोबत अवघ्या 20 रुपयांत जेवावं लागायचं, कधी कधी जेवणात खडेही मिळायचे. ते चार दिवस तिच्या आयुष्यातील खूप कठीण दिवस असल्याचं तिने म्हटलं.
रश्मी पुढे म्हणाली, “मला समजलं की, मी कधीही स्वतःबद्दल विचारही केला नव्हता. मी प्रत्येक गोष्टीत इतकी अडकले की मी स्वतःलाच विसरले.” बराच वेळ तणावाखाली राहिल्यानंतर रश्मी आता त्यातून बाहेर आली आहे.
View this post on Instagram
रश्मी घटस्फोटाबद्दलही मोकळेपणाने बोलली
रश्मीने तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं.ती म्हणाली “माझा घटस्फोट झाला, मग माझ्या मित्रांना वाटलं की मी जास्त बोलत नाही, मग माझ्या घरच्यांना माझे सर्व निर्णय चुकीचे वाटले.” पुढे ती म्हणाली “मी शो केले पण शांतपणे झोपली नाही, कधीच ते इतरांना दाखवलं नाही. मी तणावात असल्याचं कोणाला सांगितलं नाही. मला वाटायचं, हे कसलं जीवन आहे? यापेक्षा मरण चांगलं असू शकतं.” असं म्हणत तिने आपल्या या कठीण प्रसंगांवर भाष्य केलं आहे.