Rashmika Mandanna हिने गुपचूप उरकलं लग्न! अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

अभिनेता विजय देवरकोंडा नाही तर, कोणासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना अडकली विवाहबंधनात? सध्या सर्वत्र रश्मिका मंदाना हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Rashmika Mandanna हिने गुपचूप उरकलं लग्न! अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 10:51 AM

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘मी विवाहित आहे…’ असं वक्तव्य रश्मिका मंदाना हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. एवढंच नाही तर, गुपचूप लग्न केल्याचा खुसाला देखील अभिनेत्रीने केला आहे. रश्मिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते देखील कायम उत्सुक असतात. नॅशनल क्रश म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी रश्मिका तिच्या डेटिंग लाइफमुळे अनेकदा चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून रश्मिका हिचं नाव दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत जोडलं जात आहे. त्यांच्या डेटींगच्या अनेक गोष्टी कायम चाहत्यांच्या समोर येत राहतात. एवढंच नाही तर, फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरलही होतात. पण आता अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. रश्मिकाने गुपचूप लग्न केले आहे, पण विजयसोबत नाही तर, दुसऱ्या व्यक्तीसोबत.. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चत आली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीला तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं. यावर उत्तर देत अभिनेत्रीने ‘मी विवाहित आहे…’ असं वक्तव्य रश्मिका केलं. रश्मिकाने केलेल्या वक्तव्यानंतर प्रत्येक जण प्रचंड हैराण झाला. नंतर अभिनेत्री म्हणाली, ‘मी एनीमे कॅरेक्टर ‘नरूटो’ याच्यासोबत गुपचूप लग्न केलं आहे…’ अभिनेत्रीच्या विनोदी उत्तरावर प्रत्येक जण पोट धरुन हासू लागला… सध्या सर्वत्र रश्मिका हिंच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

रश्मिका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

दोघांनी नात्याची कबुली दिली नसली तरी, अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. रश्मिका देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आता रश्मिका लवकरच अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अभिनेता विजय देवकोंडा ‘कुशी’ सिनेमात अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. १ सप्टेंबर रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.