रश्मिका मंदानाची अपघातानंतर पहिली पोस्ट; म्हणाली, ‘आयुष्य नाजूक आणि लहान…’
Rashmika Mandanna: 'आयुष्य नाजूक आणि लहान...', अपघातानंतर रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट, कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती, मोठी अपडेट समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका मंदाना हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा...
अभिनेत्री रश्मिका मंदाना कायम सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोशल मीडियापासून देखील दूर आहे. अभिनेत्री का लाईमलाईट पासून दूर होती? असा प्रश्न अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील पडला असेल. त्याचं कारण देखील समोर आलं आहे. रश्मिकाचा अपघात झाल्यामुळे ती लाईमलाईटपासून दूर होती. खुद्द रश्मिकाने अपघात झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिकाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
रश्मिकाने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘तुम्ही सगळे कसे आहात? मला माहिती गेल्या काही दिवसांपासून मी लाईमलाईट नव्हते. सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती. गेल्या महिन्यापासून मी सोशल मीडियावर सक्रिय नाही. कारण माझा छोटा अपघात झाला होता. आता माझी प्रकृती स्थिर आहे…’
View this post on Instagram
‘डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरीच आराम करत होती. आता माझी प्रकृती स्थिर आहे. आता पुन्हा सक्रिय होण्यासाठी सज्ज झाली आहे. मला फक्त तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. कायम स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. कारण आयुष्य फार नाजूक आणि लहान आहे आणि आपल्याला नाही माहिती उद्या आपल्या आयुष्यात काय होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नव्या दिवशी आनंदाचा स्वीकार करा… सध्या अपडेट म्हणजे मी खूप सारे मोदक खात आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
रश्मिकाच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘ऐकून आनंद झाला की तुझी प्रकृती आता स्थिर आहे.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘माझी मुलगी पुन्हा आली आणि मला आनंद आहे तू आता ठिक आहेस.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘लवकर ठिक हो… आराम कर… आरोग्य धन आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिकाची चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘ॲनिमल’ सिनेमामुळे रश्मिकाच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सिनेमात अभिनेत्रीने पहिल्यांदा अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.
आता रश्मिका ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शिवाय अभिनेता सलमान खान स्टारर ‘सिकंदर’ सिनेमात देखील रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमात देखील रश्मिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.