रश्मिका मंदाना हिच्या फेक व्हिडीओनंतर अमिताभ बच्चन मैदानात, थेट कायदेशीर…
रश्मिका मंदाना हिचा एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी थेट कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील केली. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
मुंबई : रश्मिका मंदाना हे नाव कायमच चर्चेत आहे. रश्मिका मंदाना हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. सध्या रश्मिका मंदाना हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरस होताना दिसतोय. रश्मिका मंदाना हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. विशेष म्हणजे रश्मिका मंदाना हिचा व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ फेक आहे. एका अॅपच्या मदतीने तो व्हिडीओ तयार करण्यात आलाय.
रश्मिका मंदाना हिचा हा फेक व्हिडीओनंतर मोठा संताप हा व्यक्त केला जातोय. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी दिसत आहे, जी लिफ्टमध्ये जाताना दिसतंय. आता या व्हिडीओच्या प्रकारानंतर मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. अनेकांनी थेट कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला देखील दिलाय.
या सर्व प्रकारानंतर आता थेट अमिताभ बच्चन हे रश्मिका मंदाना हिच्या सपोर्टमध्ये मैदानात आल्याचे बघायला मिळाले. अमिताभ बच्चन यांनी एक खास पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाही तर घडलेल्या प्रकारानंतर अमिताभ बच्चन यांनी संताप व्यक्त करत नाराजी देखील जाहिर केलीये.
yes this is a strong case for legal https://t.co/wHJl7PSYPN
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 5, 2023
अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, हो हे कायदेशीरदृष्ट्या मजबूत प्रकरण आहे. आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा काही दिवसांपूर्वीच गूडबाय हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने चांगलाच मोठा धमाका हा केला.
या चित्रपटामध्ये मुलगी आणि वडिलांचे सुंदर असे ना आणि प्रेम दाखवण्यात आले. चाहत्यांनी या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद दिल्याचे देखील बघायाल मिळाले. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रश्मिका मंदाना ही दिसली. थेट पहिलाच बाॅलिवूड चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत करण्याची सुवर्णसंधी ही रश्मिका मंदाना हिला मिळाली.