रश्मिका मंदानावर कोसळला दुःखाचा डोंगर; भावूक पोस्ट करत म्हणाली, ‘पुन्हा लवकरच भेटू…’
Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाची भावूक पोस्ट पाहून तुमच्याही येईल डोळ्यात पाणी.... अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर..., रश्मिका मंदाना हिच्या खासगी आयुष्यात नक्की झालं तरी काय? सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा...
अभिनेता रश्मिका मंदाना हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या सदस्याने अखेरचा श्वास घेतला आहे. रश्मिका हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे. रश्मिका मंदाना हिचा पाळीव कुत्रा ‘मॅक्सी’ याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेत्रीने कुत्र्याचा एक फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र रश्मिका हिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
भावना व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, ‘देव तुझ्या आत्म्याला शांती देवो…. माझी उत्तम आणि छोटी मॅक्सी… आम्हाला तुझी कायम आठवण येईल. आपम लवकरच पुन्हा भेटू अशी आशा… तोपर्यंत निरोप…’, सांगायचं झालं तर, रश्मिका पाळीव प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते.
मॅक्सीवर देखील अभिनेत्रीचं प्रचंड प्रेम होतं. रश्मिका मंदाना कायम मॅक्सीसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत दोघांवर प्रेमाचा वर्षाव करायचे. सध्या रश्मिकाच्या खासगी आयुष्याची तुफान चर्चा रंगली आहे.
रश्मिका हिचे आगामी सिनेमे…
रश्मिका मंदाना हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 6 डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा’ सिनेमाच्या यशानंतर चाहते ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
सांगायचं झालं तर, रश्मिका दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण रश्मिका हिने कधीच स्वतःला साऊथ इंडस्ट्रीपर्यंत मर्यादीत ठेवलं नाही. अभिनेत्रीने ‘गुडबाय’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्री ‘मिशन मजनू’, ‘ॲनिमल’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका बजावली. ‘ॲनिमल’ सिनेमामुळे रश्मिका हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
‘ॲनिमल’ सिनेमात रश्मिका हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठा गल्ला जमवला. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.