Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Mandanna | रश्मिकाच्या मॅनेजरने केली लाखोंची फसवणूक; अभिनेत्रीने उचललं मोठं पाऊल

टॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती लवकरच संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत.

Rashmika Mandanna | रश्मिकाच्या मॅनेजरने केली लाखोंची फसवणूक; अभिनेत्रीने उचललं मोठं पाऊल
Rashmika Mandanna Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 11:40 AM

हैदराबाद : अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या आगामी ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. रश्मिकाच्या मॅनेजरने तिची 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर तिने ताबडतोब मॅनेजरला कामावरून काढून टाकलं आहे. हा मॅनेजर रश्मिकाच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच तिच्यासोबत काम करत होता. मात्र 80 लाख रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर येताच रश्मिकाने त्याला लगेचच कामावरून काढून टाकलं. याबद्दल अद्याप रश्मिकाची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. रश्मिकाला या घटनेला अधिक महत्त्व द्यायचं नाही, म्हणून तिने मॅनेजरला कामावरून टाकून प्रकरण तिथेच मिटवण्याचा प्रयत्न केला, असं कळतंय.

टॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर रश्मिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती लवकरच संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रश्मिका ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पहिल्या भागातील तिची श्रीवल्लीची भूमिका चांगलीच गाजली होती.

‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाची कथा अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन संपते. त्यामुळे ‘पुष्पा : रुल’ या दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता आहे. अल्लु अर्जूनच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी त्याला धमाकेदार पोस्टर प्रदर्शित केला होता. यामध्ये त्याचा कधी न पाहिलेला अवतार पहायला मिळाला होता. पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. ‘पुष्पा : द रूल’साठी त्याने तब्बल 85 कोटी रुपये स्वीकारल्याचं कळतंय. हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनला आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपटांसोबतच रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. ‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडाशी तिचं नेहमीच नाव जोडलं जातं. मात्र या दोघांनी त्यावर कधीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र रश्मिकाने तिच्या वाढदिवशी सोशल मीडियावरील एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. ‘रश्मिका आणि विजय हे एकमेकांना डेट करत असल्याचं सिद्ध झालंय. विजयची आवडती अंगठी रश्मिकाच्या हातात आहे आणि दोघं एकाच घरात राहत आहेत’, असं वृत्त ट्विटरवर शेअर करण्यात आलं होतं. त्यावर रश्मिकाने प्रतिक्रिया देत लिहिलं होतं, ‘अय्यो… बाबू जास्त विचार करू नका.’ यासोबतच तिने हसण्याचा आणि हृदयाचा इमोजी पोस्ट केला होता.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.