Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सामी सामी’ गाण्यावर चिमुकलीचा अफलातून डान्स; व्हिडीओ पाहून रश्मिका म्हणाली..

रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विकास बहल दिग्दर्शित 'गुडबाय' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.

'सामी सामी' गाण्यावर चिमुकलीचा अफलातून डान्स; व्हिडीओ पाहून रश्मिका म्हणाली..
Rashmika Mandanna Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 12:49 PM

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. यातील गाणी आणि डायलॉग सोशल मीडियावर लोकप्रिय ठरली. अनेकांनी त्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ (Sami Sami) या गाण्यावर एका शाळेतल्या मुलीने अफलातून डान्स केल्याचा हा व्हिडीओ आहे. खुद्द रश्मिकाने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘या क्यूट मुलीने माझा दिवस गोड केला, मला तिला भेटायची इच्छा आहे’, अशी प्रतिक्रिया रश्मिकाने व्हिडीओवर दिली. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ या चित्रपटात रश्मिकाने श्रीवल्ली ही भूमिका साकारली. शाळेतल्या लहान मुलीचा आपल्या गाण्यावरील डान्स पाहून ती खूप खूश झाली.

हे सुद्धा वाचा

रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विकास बहल दिग्दर्शित ‘गुडबाय’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हा कॉमेडी ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यासोबतच पुष्पा या चित्रपटाच्या सीक्वेलच्या शूटिंगलाही सुरुवात झाली. यामध्येही अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या मुख्य भूमिका पहायला मिळतील. त्याचप्रमाणे सुकुमार हेच सीक्वेलचं दिग्दर्शन करणार आहेत. नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिकाने गीता गोविंदम, डिअर कॉम्रेड, सरिले नीकेव्वरू, भीष्म यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ती एक्स्प्रेशन क्वीन म्हणूनही ओळखली जाते.

आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.