Rashmika Mandanna: ‘कांतारा’ पाहिला नाही म्हणून ट्रोल करणाऱ्यांना रश्मिकाचं सडेतोड उत्तर

'कांतारा' न पाहिल्यामुळे टीका करणाऱ्यांवर भडकली रश्मिका; म्हणाली "आमच्या खासगी आयुष्यावरही कॅमेरे.."

Rashmika Mandanna: 'कांतारा' पाहिला नाही म्हणून ट्रोल करणाऱ्यांना रश्मिकाचं सडेतोड उत्तर
Rashmika MandannaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 2:48 PM

मुंबई: अभिनेत्री रश्मिका मंदानाने ‘कांतारा’ हा चित्रपट न पाहिल्याचं वक्तव्य केल्याने सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा हा मूळ कन्नड चित्रपट इतर भाषांमध्येही प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अनेक कलाकार या चित्रपटाचं कौतुक करत होते. त्यामुळे जेव्हा रश्मिका म्हणाली की तिने हा चित्रपट पाहिला नाही, तेव्हा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता त्या ट्रोलिंगवर तिने प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत कन्नड चित्रपटसृष्टीत तिच्यावर बंदी आणली का, यावरही तिने उत्तर दिलं आहे.

“ट्रोलर्ससाठी माझ्या मनात फक्त प्रेम आहे. त्याविषयी आणखी काय वेगळं म्हणावं हे मला समजत नाहीये. त्यामुळे मी हा विषय त्यांच्यावरच सोपवते”, असं रश्मिका म्हणाली.

हे सुद्धा वाचा

यावेळी पुन्हा एकदा रश्मिकाला कांतारा चित्रपट पाहिलास का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने सांगितलं, “चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या दोन-तीन दिवसांनंतर लगेच मला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा मी तो पाहू शकली नव्हती. मात्र आता मी तो चित्रपट पाहिला आहे आणि टीमला शुभेच्छा देण्यासाठी मेसेजसुद्धा केला आहे. त्यांच्याकडूनही मला धन्यवादचा मेसेज आला आहे. आत नेमकं काय घडतंय हे जगाला माहीत नसतं. आम्ही आमच्या खासगी आयुष्यावरही कॅमेरे लावून ते जगाला दाखवू शकत नाही.”

लोक माझ्या खासगी आयुष्याबद्दल काय बोलतायत यापेक्षा माझ्या प्रोफेशनल लाइफविषयी काय बोलतायत हे अधिक महत्त्वाचं असल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं.

एखाद्या निर्मात्याने तिच्यावर बंदी आणली का असाही प्रश्न रश्मिकाला विचारण्यात आला. “आतापर्यंत तरी कोणत्याच निर्मात्याने माझ्यावर बंदी आणली नाही”, असं उत्तर तिने दिलं. रश्मिका लवकरच ‘पुष्पा 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.