फ्लावर नहीं फायर है फायर! ‘पुष्पा 2’मधील रश्मिका मंदानाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
रश्मिका मंदानाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आगामी 'पुष्पा : द राइज' या चित्रपटातील लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. रश्मिकाचा हा लूक पाहिल्यानंतर चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने बॉलिवूडमध्येही आपली विशेष छाप सोडली. रश्मिकाच्या 28 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटातील फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा : द राइज’ हा चित्रपट 2021 च्या अखेरीस प्रदर्शित झाला होता. मूळ तेलुगू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर त्याचं इतर भाषांमध्ये डबिंग झालं. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा 2’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी रश्मिकाच्या वाढदिवशी तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करत चाहत्यांना चांगली भेट दिली आहे. रश्मिकाचा लूक पाहिल्यानंतर ‘पुष्पा’च्या सीक्वेलविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘पुष्पा : द रुल’मध्ये रश्मिका श्रीवल्लीची भूमिका साकारणार आहे. पहिल्या भागापेक्षा तिचा हा लूक बराच वेगळा आहे. यामध्ये तिने साडी नेसली असून त्यावर भरजरी दागिने घातले आहेत. श्रीवल्लीचा अत्यंत रुबाबदार अंदाज या लूकमध्ये पहायला मिळतोय. ‘पुष्पा 2’चा टीझर येत्या 8 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीक्वेलमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासोबतच साई पल्लवी, फहाद फासिल यांच्याही भूमिका आहेत. सुकुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून त्याचा बजेट पहिल्यापेक्षा बऱ्याच कोटींनी अधिक आहे. काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा 2’च्या सेटवरून रश्मिकाचा लूक व्हायरल झाला होता. यामध्ये ती लाल रंगाची साडी आणि भांगेत सिंदूर अशा लूकमध्ये दिसून आली होती.
Wishing the 𝒏𝒂𝒕𝒊𝒐𝒏’𝒔 𝒉𝒆𝒂𝒓𝒕𝒕𝒉𝒓𝒐𝒃 ‘Srivalli’ aka @iamRashmika a very Happy Birthday 🫰🏻#Pushpa2TheRuleTeaser on April 8th 🔥#PushpaMassJaathara 💥#Pushpa2TheRule Grand Release Worldwide on 15th AUG 2024.
Icon Star @alluarjun @aryasukku #FahadhFaasil… pic.twitter.com/AnsbEXZqJT
— Pushpa (@PushpaMovie) April 5, 2024
अल्लू अर्जुनला ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’देखील मिळाला आहे. यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी काहीच फी घेतली नाही. मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी 33 टक्के भाग त्याला मिळणार आहे.
‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने 30 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता दुसऱ्या भागाचे हक्क नेटफ्लिक्सने विकत घेतल्याचं कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी नेटफ्लिक्सने ॲमेझॉन प्राइम व्हिडीओपेक्षा तिप्पट रक्कम दिली आहे.