मराठमोळ्या रसिका सुनीलचा बोल्ड अंदाज; इन्स्टाग्राम हॅकरचा घेतला असा सूड
मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीमधील हॉट फोटो पोस्ट केले आहेत. काही वर्षांपूर्वी तिने हेच फोटो पोस्ट केल्यानंतर तिचा अकाऊंट हॅक झाला होता. आता पुन्हा एकदा तिने तेच फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. बिकिनी आणि मोनॉकिनीमधील फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. काही वर्षांपूर्वी रसिकाने हेच बोल्ड फोटो तिच्या अकाऊंटवर पोस्ट केले होते. त्याच्या वर्षभरानंतर तिचा इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाला होता. हॅकरने रसिकाच्या अकाऊंटवरून तिचे हे बोल्ड फोटो काढून टाकले होते. आता पुन्हा तेच फोटो पोस्ट करत रसिकाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने त्यावरील कमेंट सेक्शन बंद केलंय.
रसिका सुनीलची पोस्ट
‘काही वर्षांपूर्वी मी हे फोटो पोस्ट केले होते. त्याच्या वर्षभरानंतर माझा अकाऊंट हॅक झाला आणि हॅकरने माझ्या इन्स्टाग्रामवरून हे फोटो काढून टाकले होते. ज्याप्रकारे मी स्वत:ला मेंटेन ठेवलं होतं, त्याबद्दल आजतागायत मला अभिमान आहे. शारीरिक गोष्टींच्या बाबतीतील यश या फोटोमध्येही पहायला मिळतंय. आता मला प्रेरणा मिळावी म्हणून मी पुन्हा एकदा हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करतेय. पुन्हा त्याच फिटनेसकडे वळण्याचा प्रयत्न करतेय. हो, मी कमेंट सेक्शन बंद ठेवणार आहे, कारण खराब डोक्याच्या लोकांचे कमेंट्स वाचून मला माझी मानसिक शांत गमवायची नाही’, असं तिने लिहिलंय.
रसिकाने तिच्या या फोटोंवरील कमेंट्स बंद केले असले तरी अवघ्या काही तासांत त्यावर लाइक्सचा वर्षाव होत आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत तीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यासोबतच रसिकाने बिकिनीमधील आणखी एक फोटो पोस्ट करत त्यावरील कमेंट्ससुद्धा बंद केले आहेत.
रसिकाने 2016 मधअये ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत तिने साकारलेली शनायाची भूमिका चांगलीच गाजली होती. याशिवाय तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘तुला कळणार नाही’, ‘गर्लफ्रेंड’, ‘उर्मी’, ‘फकाट’, ‘डंका हरीनामाचा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. रसिकाने ऑक्टोबर 2021 मध्ये आदित्य बिलागीशी लग्न केलंय.