Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ratan Rajput | “कोल्ड ड्रिंकमध्ये मिसळलं ड्रग्ज अन्..”; अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

रतनने 2006 मध्ये 'रावण' या टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात केली. मात्र 2009 मध्ये 'अगले जनम मोहे बिटियाँ ही कीजो' या मालिकेती लालीची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. 2010 मध्ये जेव्हा 'रतन का रिश्ता' या रिॲलिटी शोमध्ये ती झळकली

Ratan Rajput | कोल्ड ड्रिंकमध्ये मिसळलं ड्रग्ज अन्..; अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
Ratan RajputImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 10:43 AM

मुंबई | 17 जुलै 2023 : छोट्या पडद्यावरील ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रतन राजपूत बऱ्याच काळापासून स्क्रीनपासून दूर आहे. सध्या ती युट्यूब व्लॉगद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रतनने इंडस्ट्रीतील तिचा कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला. एका ऑडिशनदरम्यान रतनच्या नकळत तिच्या कोल्ड ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळण्यात आला होता. इंडस्ट्रीत येणाऱ्या नवोदित कलाकारांना अशा घटनांची माहिती मिळावी, म्हणून खुलासा करत असल्याचं तिने स्पष्ट केलं. संपूर्ण इंडस्ट्रीला वाईट म्हणता येणार नाही, पण ठराविक लोक इंडस्ट्रीची बदनामी करतात, असंही तिने म्हटलंय.

रतन एका ऑडिशनसाठी ओशिवरामधल्या हॉटेलमध्ये गेली होती. त्याठिकाणी इतर प्रसिद्ध कलाकारसुद्धा उपस्थित होते. “मी माझं ऑडिशन दिलं पण दिग्दर्शक तिथे उपस्थित नव्हते. एका सहकाऱ्याने माझं ऑडिशन घेतलं होतं. तो मला म्हणाला की मॅडम तुम्ही खूप छान ऑडिशन दिलंत. सर फक्त तुमच्याबद्दल बोलत होते. तुमचंच काम होणार. त्यावर मी त्याला ठीक आहे असं उत्तर दिलं. माझ्यासोबत माझी एक मैत्रीणसुद्धा होती. तिला स्क्रीप्ट देण्यात आली आणि मिटींगसाठी तयार राहण्यास सांगण्यास आलं होतं. पण नेमकं काय घडत होतं हे आम्हा दोघींनाही समजत नव्हतं”, असं रतनने सांगितलं.

याविषयी ती पुढे म्हणाली, “आम्हाला दुसऱ्या एका हॉटेलमध्ये जावं लागलं. तिथल्या होस्टने आम्हाला कोल्ड ड्रिंक्स घेण्याची विनंती केली. आम्हाला ते प्यायचं नव्हतं, पण ते सतत विनंती करत होते म्हणून थोडंसं प्यायलो. पण घरी आल्यानंतर आम्हा दोघींनाही अस्वस्थ वाटत होतं. तेव्हा मला संशय आला की कोल्ड ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळलं होतं. कारण काही तासांनंतर आम्हाला दुसऱ्या ऑडिशनसाठी फोन आला होता. पण आम्ही तिथे पुन्हा गेलोच नाही.”

हे सुद्धा वाचा

रतनने 2006 मध्ये ‘रावण’ या टीव्ही शोमधून करिअरची सुरुवात केली. मात्र 2009 मध्ये ‘अगले जनम मोहे बिटियाँ ही कीजो’ या मालिकेती लालीची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली. 2010 मध्ये जेव्हा ‘रतन का रिश्ता’ या रिॲलिटी शोमध्ये ती झळकली, तेव्हा तिची लोकप्रियता आणखी वाढली होती. रतनने बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्येही भाग घेतला होता.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.