साखरपुडा मोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी अक्षय कुमार – रवीना टंडन दिसले एकत्र; नेटकरी म्हणाले ‘असंभव’!

अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहरा' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती.

साखरपुडा मोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी अक्षय कुमार - रवीना टंडन दिसले एकत्र; नेटकरी म्हणाले 'असंभव'!
Akshay Kumar and Raveena TandonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 1:36 PM

मुंबई : 90 च्या दशकात अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. वर्तमानपत्र आणि फिल्म मॅगझिनमध्ये या दोघांच्या अफेअरचे किस्से रंगायचे. आता बऱ्याच वर्षांनंतर ही प्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली आहे. अक्षय आणि रवीनाला नुकत्याच एका कार्यक्रमात एकमेकांशी गप्पा मारताना पाहिलं गेलं आहे. मुंबई रविवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी अक्षय आणि रवीनासुद्धा पोहोचले होते. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये अक्षय आणि रवीना एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. बऱ्याच वर्षांनंतर या लोकप्रिय जोडीला एकत्र पाहून चाहत्यांनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघं स्टेजवर एकत्र दिसत आहेत. रवीना ही अक्षयचं कौतुक करताना म्हणतेय, “90 च्या दशकातील एक रॉकस्टार जो आजसुद्धा रॉकस्टार आहे आणि नेहमीच रॉकस्टार राहणार.” याशिवाय रवीना आणि अक्षयचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये दोघं बाजूबाजूला बसलेले आहेत आणि गप्पा मारत आहेत.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हे काय पाहतोय, असंभव’ असं एकाने लिहिलं. तर ‘जुन्या दिवसांची पुन्हा आठवण आली’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘प्रॅक्टिकली याला म्हणतात की मूव्ह ऑन होणं’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती. त्यांच्या अफेअरचे किस्से आजही चवीने चघळले जातात. 90 च्या दशकात या दोघांचा साखरपुडाही झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. नंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.