Raveena Tandon हिच्या लग्नातील Unseen व्हिडीओ अखेर समोर, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून म्हणाल…
Raveena Tandon | रवीना टंडन हिच्या लग्नातील कधीही न पाहिलेला व्हिडीओ अखेर समोर आलाच... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या व्हिडीओची चर्चा... व्हिडीओ पाहून म्हणाल..., सोशल मीडियावर रवीना हिचा व्हिडीओ तुफान व्हायरल...
फोटो, व्हिडीओ, रील्स, शॉर्ट व्हिडीओची आता क्रेझ आपण सर्वत्र पाहत असतो. सोशल मीडियावर कायम नवीन ट्रेन्ड येत असतात. पण सेलिब्रिटींचे जुने व्हिडीओ समोर आल्यानंतर ते व्हिडीओ देखील तुफान चर्चेत येतात. आता देखील अभिनेत्री रवीना टंडन हिच्या लग्नातील कधीह न पाहिलेला व्हिडीओ समोर आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रवीना हिच्या लग्नाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. रवीना टंडन हिचं लग्न अनिल थडानी यांच्यासोबत झाला आहे. लग्नात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत होती.
अनिल आणि रवीना यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांचा विवाह देखील शाही पद्धतीत झाला. अनिल आणि रवीना यांचा विवाह उदयपूरच्या जग मंदिर पॅलेसमध्ये सिंधी आणि पंजाबी पद्धतीत झाला. रिपोर्ट्सनुसार, रवीना टंडन 100 वर्ष जुन्या शाही डोलीत बसून लग्नासाठी मंडपात आली होती.
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रवीना लाल आणि सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात नववधूच्या रुपात प्रचंड सुंदर दिसत आहे. फेब्रुवारी 2004 मध्ये रवीना टंडन आणि अनिल थडानी यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
रवीना आणि अनिल यांना दोन मुलं आहे. 2004 मध्ये लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीने 2005 मध्ये मुलगी राशा थडानी हिला जन्म दिला. त्यानंतर 2008 मध्ये अभिनेत्रीने मुलगा रणबीरवर्धन याला जन्म दिला. राशा थटानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
रवीना टंडन हिची लेक राशा थडानी देखील आई प्रमाणेच सुंदर आहे. राशा अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. राशा कामय सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील राशा हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. राशा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. एवढंच नाहीतर, रवीना देखील लेकीसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अनिल थडानी यांची रवीना दुसरी पत्नी
रवीना अनिल यांची दुसरी पत्नी आहे. अनिल थडानी यांचं पहिलं लग्न नताशा सिप्पी यांच्यासोबत झालं होतं. अनिल आणि नताशा यांना देखील दोन मुलं आहेत. एका पार्टीमध्ये नताशा आणि रवीना आमने – सामने आल्या होत्या. तेव्हा दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती देखील समोर आली होती.