मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप; धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या ड्राइव्हर मारहाणीचा, शिवागाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मद्यधुंद अवस्थेत रवीनाने वृद्ध महिलेवर हात उचलल्याचा आरोप या व्हिडीओत करण्यात आला आहे.

मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप; धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल
Raveena TandonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 11:19 AM

अभिनेत्री रवीना टंडनवर शनिवारी रात्री उशिरा मुंबईतील वांद्रे परिसरात तीन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी रवीनाला स्थानिकांनी घेरलं होतं. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवीनाच्या ड्राइव्हरवर रॅश ड्राइव्हिंगचा आरोप करण्यात आला आहे. रवीनाच्या ड्राइव्हरने रिझवी कॉलेजजवळील कार्टर रोडवर तीन जणांना धडकल्याचा आरोप आहे. त्यानंतर जेव्हा तिची कार स्थानिकांनी अडवली, तेव्हा रवीना मद्यधुंद अवस्थेत कारमधून बाहेर पडून पीडितांना शिवीगाळ आणि मारहाण केली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये पीडित आणि स्थानिकांनी रवीनाला घेरल्याचं पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे ते पोलिसांना बोलवताना दिसत आहेत. “तुला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येतंय”, असं एक पीडित म्हणतेय.

स्थानिकांनी घेरल्यानंतर यावेळी रवीना लोकांना व्हिडीओ रेकॉर्ट न करण्याची विनंती करते. “मला ढकलू नका, कृपया मला मारू नका”, असं रवीना या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. नंतर मोहम्मद नावाची एक व्यक्ती संपूर्ण घटना व्हिडीओत सांगताना दिसते. मोहम्मद म्हणतो, “माझी आई, बहीण आणि भाची हे रिझवी कॉलेजजवळून जात असताना रवीनाची गाडी आईवर धावून गेली. याविषयी जेव्हा विचारलं गेलं, तेव्हा ड्राइव्हरने माझ्या भाचीला आणि आईला शिवीगाळ केली. नंतर रवीनासुद्धा कारमधून बाहेर आली आणि ती मद्यधुंद अवस्थेत होती. तिनेसुद्धा माझ्या आईवर हात उचलला. माझ्या आईच्या डोक्याला मार लागला आहे.”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

आई आणि भाचीसह खार पोलीस ठाण्यात चार तास थांबल्यानंतरही पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही, असाही आरोप मोहम्मदने केला आहे. “त्यांनी आम्हाला पोलीस ठाण्याच्या बाहेर तोडगा काढण्यास सांगितलं. पण आम्ही तडजोड का करायची? माझ्या आईवर हल्ला झाला आहे आणि मी न्यायाची मागणी करतोय”, असं तो व्हिडीओत पुढे म्हणतो.

या घटनेच्या काही तासांनी रवीना तिथून निघून गेली. रवीनाचा पती आणि प्रसिद्ध ड्रिस्ट्रीब्युटर अनिल थडानी नंतर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांशी बोलून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अद्याप रवीनाकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

याप्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की, रवीना टंडनचा ड्राइव्हर त्याची कार घराच्या आत पार्क करण्यासाठी घेऊन जात होता. त्याचवेळी ती कार रिव्हर्स घेत असताना काही लोक तिथे आले आणि त्यांनी गोंधळ घातला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दोन्ही पक्षांना फिर्याद देण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र याप्रकरणी एकाही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.