मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | ‘दुल्हे राजा’, ‘पथ्थर के फूल’, ‘अखियोसे गोली मारे’, ‘लाडला’, ‘सत्ता’, ‘परदेसी बाबू’, ‘दामिनी’, ‘घरवाली बाहरवाली’ यांसारख्या असंख्य सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलवूडवर राज्य केलं. एक काळ असा होता, जेव्हा रवीना हिच्यासोबत काम करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते रांगेत असायचे. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये कमी प्रमाणात सक्रिय असली तरी, सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम सक्रिय असते. आता चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सज्ज झाली आहे. राशा हिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही, पण तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
रवीना हिला मुलाखतीत, ‘राशा देखील आता बॉलिवूडमध्ये सक्रिय होत आहे, तर ती सिनेमांमध्ये किसिंग सीन देईल?’ यावर रवीना म्हणाली, ‘सिनेमांमध्ये किसिंग सीन करायचा की नाही, हा पूर्णपणे राशा हिचा निर्णय असेल… मी तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही.’ राशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती १८ वर्षांची असून तिने पहिल्या सिनेमाचं शुटिंग सुरु केलं आहे.
अभिनेत्री रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी, अजय देवगण याचा भाचा अमन देवगण याच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राशा आणि अमन यांच्या जोडीला ‘काय पो चे’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर लॉन्च करणार आहेत. ज्यांनी अभिनेत्री सारा अली खान हिला देखील ‘केदारनाथ’ सिनेमाच्या माध्यमातून मोठा ब्रेक दिला.
राशा आणि अमन यांच्या सिनेमात ऍक्शन सीक्वेन्स चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांच्या खांद्यावर आहे. राशा थडानी सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करू शकते.. असा अंदाज दिग्दर्शकांनी वर्तवला आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेता अजय देवगण देखील सिनेमात मोठ्या भूमिकेत दिसणार आहे.
राशा आता अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर राशा कायम सक्रिय असते. राशा चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एवढंच नाही तर, राशा आई रवीना टंडन हिच्यासोबत देखील फोटो पोस्ट करत असते. चाहते दोघींच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.