Raveena Tandon | ‘मुलगी खरंच दिलदार’; रवीना टंडनच्या मुलीने वचन पूर्ण करताच नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

राशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल असून नेटकरी तिच्या नम्र स्वभावाचं कौतुक करत आहेत. 'राशा फार नम्र आहे', असं एकाने लिहिलं. तर 'इतर स्टारकिड्सपेक्षा ही खूपच वेगळी आहे', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

Raveena Tandon | 'मुलगी खरंच दिलदार'; रवीना टंडनच्या मुलीने वचन पूर्ण करताच नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Raveena Tandon and Rasha ThadaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 8:29 AM

मुंबई : बॉलिवूडमधील स्टारकिड्स नेहमीच सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असतात. या स्टारकिड्सचे फोटो आणि व्हिडीओ पापाराझींकडून सतत शेअर केले जातात. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी तिच्या लूक आणि सौंदर्यामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. मात्र यावेळी राशा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राशाने पापाराझींना केलेलं प्रॉमिस आठवणीने पूर्ण केलं असून तिच्या नम्र वागणुकीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. राशाने नुकतंच मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. निकाल लागल्यानंतर राशाने पापाराझींना एक प्रॉमिस केलं होतं. ते प्रॉमिस तिने न विसरता पूर्ण केलं आहे.

निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी राशाला मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं होतं. यावेळी पापाराझी तिचे फोटो आणि व्हिडीओ शूट करत होते. त्यांनी रवीनाच्या मुलीला शुभेच्छा दिल्या तेव्हा एअरपोर्टच्या आत जाण्याआधी राशाने सांगितलं की पुढच्या वेळी जेव्हा ती पापाराझींना भेटेल, तेव्हा त्यांच्यासाठी मिठाई घेऊन येईल. इतकंच नव्हे तर सर्वांची आवड विचारत तिने काजू कतली खाऊ घालणार असल्याचं म्हटलं होतं. हेच प्रॉमिस तिने आता पूर्ण केलं आहे.

हे सुद्धा वाचा

रविवारी जेव्हा राशाला पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं, तेव्हा तिने पापाराझींसाठी काजू कतली आणली होती. ही मिठाई वाटत तिने त्यांचे आभारम मानले. राशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल असून नेटकरी तिच्या नम्र स्वभावाचं कौतुक करत आहेत. ‘राशा फार नम्र आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘इतर स्टारकिड्सपेक्षा ही खूपच वेगळी आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

पहा व्हिडीओ

राशा या वर्षी 16 मार्च रोजी 17 वर्षांची झाली. बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सप्रमाणेच तिने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. 2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशाला जन्म दिला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.