Rasha Thandani | रवीना टंडनची मुलगी 20 वर्षांनी मोठ्या सुपरस्टारसोबत करणार रोमान्स

अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी ही आईच्या पावलांवर पाऊल टाकत फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावणार आहे. 18 वर्षीय राशाला तिच्या करिअरमधील पहिली ऑफर मिळाली असून ती लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे.

Rasha Thandani | रवीना टंडनची मुलगी 20 वर्षांनी मोठ्या सुपरस्टारसोबत करणार रोमान्स
Rasha ThadaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 10:46 AM

मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीतील नवीन स्टार किड्स चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा यांच्यासोबतच अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच फिल्म इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवणार आहे. राशाने नुकतंच तिचं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती 18 वर्षांची आहे. आई रवीनाप्रमाणेच तिचंही चित्रपटसृष्टीत काम करण्याचं स्वप्न आहे. यासाठी राशाला करिअरमधील सर्वांत पहिली ऑफरसुद्धा मिळाली आहे. ती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटात ती ज्या अभिनेत्यासोबत काम करणार आहे, तो तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे.

रिपोर्ट्सनुसार, ती RRR फेम अभिनेता रामचरणसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा एक तेलुगू चित्रपट असेल. यासाठी राशाने ऑडिशन्स दिले असून चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली आहे. त्यामुळे 18 वर्षीय राशा आता 38 वर्षीय रामचरणसोबत काम करताना दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा बजेट 300 कोटी रुपये इतका आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक बुच्ची बाबू सना याचं दिग्दर्शन करणार आहेत. हा एक स्पोर्ट्स ड्रामा असेल. राशा आणि रामचरणच्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Rasha (@rashathadani)

राशा या वर्षी 16 मार्च रोजी 17 वर्षांची झाली. बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सप्रमाणेच तिने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. 2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशाला जन्म दिला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. राशा तिच्या लूक आणि सौंदर्यामुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. बॉलिवूड पदार्पणापूर्वीच इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.