Raveena Tandon | अखेर अक्षयसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली रवीना; अफेअरमुळे शिल्पाशीही तोडली होती मैत्री

90 च्या दशकात या दोघांचा साखरपुडाही झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. नंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली.

Raveena Tandon | अखेर अक्षयसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली रवीना; अफेअरमुळे शिल्पाशीही तोडली होती मैत्री
Raveena Tandon, Akshay Kumar, Shilpa ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 12:35 PM

मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता अक्षय कुमार ही जोडी नव्वदच्या दशकात तुफान चर्चेत होती. रवीना आणि अक्षयचं अफेअर इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता बऱ्याच वर्षांनंतर रवीना याविषयी मोकळेपणे व्यक्त होताना दिसतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती अक्षयसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली. याच मुलाखतीत तिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबतच्या मैत्रीविषयीही भाष्य केलं. शिल्पा आणि अक्षयसुद्धा नव्वदच्या दशकात काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. अक्षय कुमारसोबतच्या अफेअरमुळेच शिल्पा आणि रवीनाच्या मैत्रीत कटुता आली होती.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली, “अक्षय आणि मी आताही चांगले मित्र आहोत. प्रत्येकाच्या आयुष्याचा एक प्रवास असतो. तुम्हाला त्याचा आदर करावा लागतो आणि त्यातून पुढे जावं लागतं. मी त्याचा खूप आदर करते. माझ्या तो या इंडस्ट्रीचा सर्वांत मजबूत स्तंभ आहे.” यावेळी शिल्पासोबतच्या मैत्रीविषयी विचारलं असता ती पुढे म्हणाली, “काही गोष्टींमुळे आमच्यातलं नातं सुधारलं. काही अनुभवांमुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. शमिता आणि शिल्पा माझ्या पतीच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. चांगला आणि वाईट काळ आम्ही एकमेकांसोबत घालवतो.”

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच रवीना आणि अक्षयला बऱ्याच वर्षांनंतर एकत्र पाहिलं गेलं होतं. एका पुरस्कार सोहळ्यात या दोघांनी हजेरी लावली होती. त्यावेळी दोघांचा गप्पा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पहा व्हिडीओ

अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती. त्यांच्या अफेअरचे किस्से आजही चवीने चघळले जातात. 90 च्या दशकात या दोघांचा साखरपुडाही झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. नंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.