‘ती’ अट मान्य करताच रवीना टंडनचा लग्नाला होकार, नवऱ्याला म्हणाली होती…
Raveena Tandon Marriage: रवीना टंडनने लग्नाआधी ठेवली होती 'ही' अट, लग्नाआधी नवऱ्याला म्हणाली..., रवीना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा होती जेव्हा अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची सर्वत्र चर्चा रंगली होती...
!['ती' अट मान्य करताच रवीना टंडनचा लग्नाला होकार, नवऱ्याला म्हणाली होती... 'ती' अट मान्य करताच रवीना टंडनचा लग्नाला होकार, नवऱ्याला म्हणाली होती...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/raveena-1.jpg?w=1280)
अभिनेत्री रवीना टंडन आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. रवीनाने आतापर्यंत अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना रवीना हिने 2004 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. रवीना हिने फिल्म डिस्ट्रीब्यूटर अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाआधी नेमकं काय झालं होतं? याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
लग्नाआधी रवीना हिने अनिल थडानी यांच्यासमोर एक अट ठेवली होती. सांगायचं झालं तर, वयाच्या 21 व्या वर्षी रवीना हिने दोन मुली दत्तक घेतल्या. पूजा आणि छाया अशी रवीनाच्या दत्तक मुलींची नावे आहेत. रवीना म्हणाली, लग्नाआधी दोन दत्तक मुलींची आई झाल्यामुळे लोकांनी माझ्यावर टीका केली.
View this post on Instagram
अशात अभिनेत्रीने एक अट ठेवली. अभिनेत्रीच्या आयुष्यात जो कोणी पुरुष येईल त्याला रावीनाच्या दोन दत्तक मुलींचा देखील स्वीकार करावा लागेल. रिपोर्ट्सनुसार एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती, ‘जर कोणाला प्रेम करायचं असेल तर तो करेल… मी पॅकेजसोबत येते. माझ्या जोडीदाराला माझ्या मुलींवर आणि माझ्या कुटुंबावर देखील प्रेम करावं लागेल…’ अशी अट अभिनेत्रीने ठेवली होती.
रवीना हिची अट 2004 मध्ये अनिल थडानी यांनी मान्य केली आणि रवीनाने लग्नासाठी होकार दिला. आता रवीना आणि अनिल यांच्या लग्नाला 21 वर्ष झाली आहेत. त्यांना दोन मुलं देखील आहेत. मुलगी राशा थडानी आणि रणबीर थडानी दोघांच्या मुलांची नावे आहेत.
सांगायचं झालं तर, एका असा काळ होता जेव्हा रवीनाच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या होत्या. रवीना – अनिल यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत होत्या, तेव्हा अनिल थडानी विवाहित होते. महत्त्वाचं म्हणजे रवीना हिच्यासोबत लग्न करण्यासाठी अनिल यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. रवीना ही अनिल थडानी यांची दुसरी पत्नी आहे. आज पती अनिल थडानी यांच्यासोबत रवीना रॉयल आयुष्य जगत आहे.