Raveena Tandon चा नातू तुम्ही पाहिलात का? अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
Raveena Tandon | रवीना टंडन हिने पोस्ट केले चार वर्षांच्या नातवाचे फोटो... फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली... ; सध्या सर्वत्र रवीना टंडन हिच्या नातवाची चर्चा...
मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील प्रचंड खास आहे. रवीना हिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नातवाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने नातवाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये नातवाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र रवीना टंडन हिच्या नातवाच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
रवीना टंडन हिच्या नातवाचं नाव रुद्र असं आहे. रुद्र याला चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिनेत्री म्हणाली, ‘माझा लाडका रुद्र याला वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा… चार वर्षांचा झाल्यामुळे तुला शुभेच्छा… महादेवाचे तुझ्यावर कायम आशीर्वाद राहो…’ सध्या सर्वत्र रवीना हिच्या नातवाच्या चर्चा रंगल्या आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, तुम्हाला प्रश्न पडला असेल की, रवीना हिची मुलगी राशा हिचं अद्याप लग्न झालं नाही. तर अभिनेत्रीचा नातू कसा? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असले. तर रवीना हिने दत्तक घेतलेल्या दोन मुलींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. १९९५ साली अभिनेत्री छाया आणि पूजा यांना दत्तक घेतलं होतं. रवीना टंडन हिने दत्तक घेतलेल्या दोन्ही मुलींचं लग्न झालं आहे.
लग्नानंतर रवीना हिची मुलगी छाया हिने २०१९ मध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला. रवीना हिचा नातू रुद्र आता चार वर्षांचा झाला आहे. रवीना हिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये कुटुंबातील प्रत्येक जण रुद्र याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
रवीना टंडन हिचा आगामी सिनेमा….
रवीना टंडन लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आाहे. अक्षय कुमार याने ‘वेलकम ३’ सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे ‘वेलकम ३’ सिनेमाबाबतची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र ‘वेलकम ३’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात रवीना टंडन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तब्बल १९ वर्षांनंतर रवीना – अक्षय यांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.