मुंबई: व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीदरम्यान वाघाच्या जवळ गेल्याने अभिनेत्री रवीना टंडनची चौकशी होणार, अशी माहिती समोर आली होती. त्यावर आता रवीनाने स्पष्टीकरण दिलं आहे. रवीनाने काही ट्विट्स करत तिची बाजू मांडली आहे. तिने नुकतीच सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. यावेळी तिने वाघाच्या अगदी जवळ जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘डेप्युटी रेंजर्सच्या दुचाकीजवळ वाघ आला. वाघ कधी आणि कशी प्रतिक्रिया देईल हे सांगता येत नाही. ही वनविभागाची लायसन्स्ड गाडी आहे. त्यांचे मार्गदर्शक आणि चालक सोबत असतात, ज्यांना वन्यसीमा आणि कायदेशीर बाबींचं प्रशिक्षण दिलेलं असतं’, असं तिने एका ट्विटमध्ये म्हटलंय.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये तिने वाघांविषयी लिहिलं, ‘वाघ ज्याठिकाणी फिरतात तिथले ते राजे असतात. आम्ही मूक प्रेक्षक होतो. अचानक केलेल्या कोणत्याही हालचाली त्यांचं लक्ष वेधून घेतात. सुदैवाने आम्ही कोणतीही हालचाल केली नव्हती. कुठलाही आवाज न करता आम्ही शांततेनं बसून वाघाला बघत होतो. आम्ही पर्यटकांच्या मार्गावर होतो आणि अनेकदा वाघ या रस्त्यावरून चालतात. या व्हिडीओतील कॅटी वाघिणीला वाहनांच्या जवळ येऊन गुरगुरण्याची सवय आहे.’
Close encounters of all kinds are pretty regular and uploaded by all.God forbid it happens to be a famous person in the vehicle. Guess whose fault is it then? pic.twitter.com/opT8cDVxEU
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 30, 2022
Luckily for us ,that we did not take any sudden action, but sat quiet and watched the tigress, move on.We we’re on the tourism path, which mostly these tigers cross. And Katy the tigress in this video aswell, is habituated to coming close to vehicles and snarling. pic.twitter.com/gNPBujbfBP
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 30, 2022
‘प्राणी आपल्या जवळ येण्याच्या घटना अनेकदा घडतात आणि सर्वांकडून ते अपलोड केले जातात. मात्र अशा वेळी दुर्दैवाने त्या वाहनात एखादी प्रसिद्ध व्यक्ती असू नये. असल्यास मग दोष कोणाचा’, असा सवालही तिने एका ट्विटमध्ये केला आहे. यासोबतच तिने अशा काही व्हिडीओंचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे.
#satpuratigerreserve .@News18MP reports.A tiger gets close to the deputy rangers bike. One can never predict when and how tigers will react. It’s the Forest Department licensed vehicle,with their guides and drivers who are trained to know their boundaries and legalities. pic.twitter.com/mTuGLSVPER
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 29, 2022
रवीनाने तिच्या या ट्विट्समधून कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं स्पष्ट केलंय. 22 नोव्हेंबर रोजी रवीनाने सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. यावेळी तिची जीप वाघाच्या जवळ गेली होती. वाहन चालक आणि त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून चौकशी केली जाईल, असं अधिकाऱ्याने याप्रकरणी सांगितलं होतं.
रवीनाने सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये वाघाचे तिने काढलेले फोटोसुद्धा पहायला मिळत आहेत.