Raveena Tandon | गोविंदाऐवजी रवीना टंडन हिला निवडणुकीचं तिकिट, ‘या’ पक्षाचा होता पाठिंबा

Raveena Tandon | 'या' पक्षाचा अभिनेत्री रवीना टंडन हिला होता पाठिंबा; आज बॉलिवूड नाही तर राजकारणात सक्रिय असती, अभिनेत्रीच्या 'त्या' निर्णयानंतर गोविंदा याला मिळाली संधी! सध्या सर्वत्र रवीना टंडन आणि राजकारणाची चर्चा... तेव्हा नक्की झालं तरी काय होतं? जाणून घ्या...

Raveena Tandon | गोविंदाऐवजी रवीना टंडन हिला निवडणुकीचं तिकिट, 'या' पक्षाचा होता पाठिंबा
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 1:09 PM

मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री रवीना टंडन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. बॉलिवूडला अनेक एकापेक्षा एक सिनेमे दिल्यामुळे अभिनेत्रीला पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. अभिनेत्रीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर रवीना हिच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. एक काळ असा होता, जेव्हा रवीना फक्त तिच्या अभिनयामुळे नाही तर, तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे देखील चर्चेत होती. आता देखील अभिनेत्री अनेक गंभीर मुद्द्यांवर स्वतःचं स्पष्ट मत व्यक्त करतना दिसते. ज्यामुळे अभिनेत्री राजकारणात प्रवेश करेल असा अंदाज देखीव वर्तवण्यात आला होता.

अभिनेत्री हेमा मालिनी, जया बच्चन, रेखा, उर्मिला मतोंडकर यांच्याप्रमाणे रवीना देखील बॉलिवूड सोडून राजकारणात प्रवेश करेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. आता राजकारणात येण्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट वक्तव्य केलं आहे. काँग्रेस पक्षाने एकदा अभिनेत्रीला गोविंदा याच्याजागी निवडणूक लढवण्याची संधी दिली होती.. असं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे.

रवीना टंडन आणि राजकारण

मुलाखतीत अभिनेत्रीला राजकारणाबद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा अभिनेत्री म्हणाली, ‘सर्वात जास्त पुरस्कार मला काँग्रेसच्या काळात देण्यात आले. मला एक गोष्ट याठिकाणी सांगायला आवडेल, मला काँग्रेसने मुंबईच्या तिकिटावर गोविंदा यांच्या जागी निवडणूक लढवण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. पण तेव्हा मी राजकारणात येण्यासाठी तयार नव्हती…’ सांगायचं झालं तर, २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर गोविंदाने निवडणूक लढवली होती.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘एक वेळ अशी होती, जेव्हा मी प्रत्येक गोष्टीवर विचार करायची. पूर्ण भारतातून मला निवडणूक लढवण्यासाठी ऑफर होती. पश्चिम बंगाल, पंजाब, मुंबई… पण मी तेव्हा तयार नव्हती. आजपर्यंत माझ्यावर कोणत्या पक्षाचा एवढा प्रभाव पडलेला नाही की, मी त्यांची एक विचारधारा आमलात आणू शकेल…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

रवीना टंडन हिचा आगामी सिनेमा

रवीना सध्या तिच्या आगामी ‘हाऊलफूल ३’ सिनेमामुळे व्यस्त आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रवीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सिनेमाच्या माध्यमातून रवीना आणि अक्षय जवळपास १९ वर्षांनंतर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.