रवीना टंडनने केलं लेकीचं कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. रवीना आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. रवीना आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच रवीनाने तिच्या सोशल मीडियावर स्वत: चे आणि मुलगी राशा थडानीचे काही फोटो शेअर केले आहेत. रवीनाची मुलगी राशाने तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. (Raveena Tandon shared a photo of daughter Rasha Thadani)
View this post on Instagram
याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रवीनाने फोटो शेअर केले आहेत. रवीनाने हे फोटो शेअर करत लिहिले आहे की,“माझी मुलगी ब्लॅक बेल्ट.. मला तुझ्यावर खुप गर्व आहे. रवीनाच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी रवीना आणि तिच्या मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता समीर सोनी यांने ‘ मस्तचं, सर्व मुलींनी स्वत:च्या स्वरक्षणासाठी तायक्वांदो शिकले पाहिजे अशी कमेंट केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. रवीना टंडन मोस्ट अवेटेड चित्रपट अससेल्या केजीएफ 2 (KGF 2) या चित्रपटात दिसणार आहे. ‘केजीएफ 2’ मध्ये रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी रवीना टंडनने ट्विटरवर तिचे बनावट प्रोफाईल तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केली होती.
बनावट ट्विटर हँडलवरून मुंबई पोलिसांची आणि परमबीर सिंह यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट केल्या जात होत्या तसेच, परमबीर सिंह यांच्या छायाचित्रांची छेडछाड करून ती पोस्ट केली होती. हे प्रकरण रवीनाच्या लक्षात येताच तिने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली होती.
संबंधित बातम्या :
… म्हणून इमरान हाश्मीने नाकारला आलियासोबतचा रोमँटिक चित्रपट!
Video : धर्मेंद्र यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, चाहतेही म्हणाले व्वा!
Video : टॉपलेस फोटोशूटमुळे ट्रोल झाली दिव्या अग्रवाल, ट्रोलर्सवर संतापत म्हणाली….
(Raveena Tandon shared a photo of daughter Rasha Thadani)