KGF Chapter 2: क्लायमॅक्सच्या सीनवर थिएटरमध्ये नाण्यांचा वर्षाव; रवीनाने शेअर केला पडद्यामागील दृश्यांचा Video

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केजीएफ: चाप्टर 1' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या सीक्वेलमध्ये यशसोबतच संजय दत्त, रवीना टंडन (Raveena Tandon) हे बॉलिवूडमधील चेहरेही पहायला मिळतात. नुकताच रवीनाने शूटिंगदरम्यान पडद्यामागच्या दृश्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

KGF Chapter 2: क्लायमॅक्सच्या सीनवर थिएटरमध्ये नाण्यांचा वर्षाव; रवीनाने शेअर केला पडद्यामागील दृश्यांचा Video
Raveena TandonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 9:38 AM

कन्नड सुपरस्टार यशची (Yash) मुख्य भूमिका असलेला ‘केजीएफ: चाप्टर 2’ (KGF: Chapter 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कन्नड, तमिळ, तेलुगू, हिंदी अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनने पाच दिवसांत 219.56 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या सीक्वेलमध्ये यशसोबतच संजय दत्त, रवीना टंडन (Raveena Tandon) हे बॉलिवूडमधील चेहरेही पहायला मिळतात. नुकताच रवीनाने शूटिंगदरम्यान पडद्यामागच्या दृश्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चित्रपटात तिने पंतप्रधानांची भूमिका साकारली असून तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.

रवीनाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला थिएटरमधील काही दृश्ये पहायला मिळत आहेत. केजीएफ 2चा क्लायमॅक्स सीन पाहिल्यानंतर थिएटरमध्ये प्रेक्षकांनी नाण्यांचा वर्षाव केला. याच क्लायमॅक्स सीनमध्ये ‘केजीएफ 3’ची घोषणा करण्यात आली आहे. ‘बऱ्याच कालावधीनंतर स्क्रीनवर नाण्यांचा वर्षाव होताना पाहतेय’, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याच व्हिडीओत पुढे केजीएफ 2 ची पडद्यामागील दृश्ये पहायला मिळतात. शूटिंगच्या शेवटच्या दिवसाची ही दृश्ये आहेत.

पहा व्हिडीओ-

रवीनाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. ‘क्लायमॅक्सच्या त्या सीनने माझ्या अंगावर काटाच आणला’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुफान फिर आयेगा रवीनाजी’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं. ‘निर्मात्यांनी तुम्हाला पहिल्या भागातही घ्यायला हवं होतं’, असंही एकाने लिहिलं आहे. ‘केजीएफ 2’ हा पहिल्याच आठवड्यात आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाचा लाइफटाइम कमाईचा आकडा पार करणार असल्याची शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने व्यक्त केली आहे.

‘केजीएफ: चाप्टर 2’ची आतापर्यंतची कमाई

गुरुवार- 53.95 कोटी रुपये शुक्रवार- 46.79 कोटी रुपये शनिवार- 42.90 कोटी रुपये रविवार- 50.35 कोटी रुपये सोमवार- 25.57 कोटी रुपये एकूण- 219.56 कोटी रुपये

हेही वाचा:

Kajal Aggarwal: ‘सिंघम’ फेम काजल अगरवाल झाली आई; घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

KGF 2 Box Office Collection : खान-बिन विसरा सगळे, केजीएफचा ‘यश’ सगळ्यांवर भारी, फास्टेस्ट 200 कोटींची कमाई

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.