मृत्यूनंतरही रवीना टंडन हिचे वडील चाहत्यांच्या मनात, चौकातील ‘तो’ व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

Raveena Tandon : मृत्यूनंतरही का चर्चेत आहेत रवीना टंडन हिचे वडील? सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे रवीना टंडन हिचा एक व्हिडीओ... चौकातील 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील व्हाय भावूक

मृत्यूनंतरही रवीना टंडन हिचे वडील चाहत्यांच्या मनात, चौकातील 'तो' व्हिडीओ पाहून व्हाल भावूक
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 1:36 PM

मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री रवीना टंडन आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे किंवा कोणत्या सिनेमामुळे नाही तर, दिवंगत वडील रवी टंडन यांच्यामुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम करत रवीना यशाच्या शिखरावर पोहोचली आणि स्वतःचं नाव मोठं केलं. पण आता रवीना हिला तिच्या आई – वडीलांचा अभिमान वाटत आहे. मृत्यूनंतर देखील देखील रवीना हिचे वडील चाहत्यांच्या मनात आहेत. शुक्रवारी रवीना टंडनचे वडील रवी टंडन यांच्या नावाने एका चौकाचे अनावरण करण्यात आले.

रवी टंडन बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते होते. आज रवी टंडन यांचा जन्मदिवस आहे. रवी टंडन यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, मुंबईतील जुहू येथे दिवंगत रवी टंडन यांच्या नावाने एक चौक बांधण्यात आला. ज्याचं अनावरण रवीना टंडन हिने केलं. अभिनेत्रीने लेक राशा थडानी हिच्यासोबत या चौकाचे उद्घाटन केलं.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर रवीना टंडन हिचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये रवीना आई आणि लेक राशा थडानी हिच्यासोबत दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रवीना टंडन हिची चर्चा रंगली आहे. व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिने देखील आजोबा रवी टंडन यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राशा हिने श्री रवी टंडन चौक हा फोटो पोस्ट करत, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबा… आय लव्ह यू…’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

रवीना टंडन हिची लेक राशा थडानी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. राशा अभिनेत्री नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. राशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.

राशा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, राशा अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा याचा मुलगा अरहान खान याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अरहान आणि राशा यांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.