‘ताटात ड्रग्ज असेल तर मी छेद करणारच’; जया बच्चन यांच्या ड्रग्जच्या वक्तव्यावर रवी किशन यांची प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावेळी नार्कोटिक्स डिपार्टमेंटने अनेकांना अटक केली होती. बऱ्याच सेलिब्रिटींची एनसीबीकडून चौकशी झाली होती.

'ताटात ड्रग्ज असेल तर मी छेद करणारच'; जया बच्चन यांच्या ड्रग्जच्या वक्तव्यावर रवी किशन यांची प्रतिक्रिया
Jaya Bachchan and Ravi KishanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 3:41 PM

मुंबई : अभिनेते आणि खासदार रवी किशन सध्या चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कास्टिंग काऊचचा धक्कादायक खुलासा केला होता. तर ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत प्रश्नांची मोकळेपणे उत्तरं दिली. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील ड्रग्जचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी रवी किशन यांनीसुद्धा बॉलिवूडमधील ड्रग्जच्या व्यसनाबाबत टिप्पणी केली होती. याच टिप्पणीवरून ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांच्यावर भडकल्या होत्या. ज्या ताटात जेवतात, त्याच ताटात छेद करतात, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावर आता रवी किशन यांनी उत्तर दिलं आहे.

जया बच्चन यांनी माझ्या वक्तव्याचा अर्थ चुकीचा घेतला, असं रवी किशन म्हणाले. “त्यांना माझा प्रश्न ऐकला नाही. मी त्यांचा आईप्रमाणे आदर करतो. मी आजसुद्धा त्यांच्या पाया पडतो. मी असं म्हटलं होतं की इंडस्ट्रीमध्ये जो ड्रग्स येतोय, त्यापासून एक हिरो म्हणून स्वत:ला आपण वाचवलं पाहिजे. मी पंजाबच्या माध्यमातून ड्रग्जच्या आयातीबद्दल बोलत होतो. त्यांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला. जर त्यांनी ड्रग्ज घेतला तर त्यांना ड्रग्ज खाऊ घातलेल्या हातांना मी चावणार. त्या ताटात जर ड्रग्ज असेल तर मी त्यात छेद करत राहणार”, असं ते पुढे म्हणाले.

सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावेळी नार्कोटिक्स डिपार्टमेंटने अनेकांना अटक केली होती. बऱ्याच सेलिब्रिटींची एनसीबीकडून चौकशी झाली होती. त्याचवेळी रवी किशन यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. बॉलिवूडमधील बरेच लोक ड्रग्जचं सेवन करतात आणि पॅडलिंगसुद्धा करतात असं ते म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

रवी किशन यांच्या या वक्तव्यावर जया बच्चन भडकल्या होत्या. “फक्त काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर टीका करणं योग्य नाही. ज्या ताटात तुम्ही खाता, त्याच ताटात छेद करत आहात. जे लोक फिल्म इंडस्ट्रीची प्रतिमा मलिन करत आहेत आणि त्याला गटार म्हणत आहेत, मी त्यांच्या विरोधात आहे”, असं त्या म्हणाल्या होत्या. सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्री कंगना रनौतने बॉलिवूड इंडस्ट्रीला ‘गटार’ असं म्हटलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.