विवाहित रवी किशन यांचं नगमासोबत होतं अफेअर? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सोडलं मौन

2009 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नगमाने अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. "मला एक गोष्ट समजत नाही की तुमच्या सहकलाकारासोबत चांगली मैत्री झाली तर काय बिघडलं? आम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असलो तर त्यात काय चुकीचं आहे?" असा सवाल केला होता.

विवाहित रवी किशन यांचं नगमासोबत होतं अफेअर? बऱ्याच वर्षांनंतर अखेर सोडलं मौन
Ravi Kishan and NagmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 10:48 AM

नवी दिल्ली : नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नगमाने हिंदीसोबतच भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘पंडित जी बताई ना बियाह कब होई’ या चित्रपटातून तिने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये तिने अभिनेते रवी किशन यांच्यासोबत भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर दोघांनी बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं होतं. त्याचदरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागल्या होत्या. त्यावेळी रवी किशन विवाहित होते. आता बऱ्याच वर्षांनंतर रवी किशन यांनी या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

रवी किशन हे नुकतेच ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात पोहोचले होते. या मुलाखतीत त्यांना नगमा यांच्यासोबतच्या अफेअरविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रवी किशन म्हणाले, “आम्ही यासाठी एकत्र बरेच चित्रपट केले, कारण आमचे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरत होते. आमच्यात चांगली मैत्रीसुद्धा होती. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला हे माहित होतं की मी विवाहित होतो. मी माझी पत्नी प्रिती शुक्लाचा खूप आदर करतो आणि प्रसंगी मला तिची भीतीही वाटते. मी हे आधीसुद्धा सांगितलंय की मी तिच्या पायाही पडतो. माझ्याकडे जेव्हा पैसा नव्हता, तेव्हापासून ती माझ्यासोबत आहे. तिने माझी साथ कधीच सोडली नाही.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Ravi Kishan (@ravikishann)

यावेळी रवी किशन ‘बिग बॉस’ या शोविषयीही व्यक्त झाले. “माझे चित्रपट हिट होऊ लागल्यानंतर मी जरा अहंकारी झालो होतो. त्यावेळी बिग बॉसमध्ये भाग घेण्याचा सल्ला माझ्या पत्नीने दिला होता. सुरुवातीला मी संभ्रमात होतो, पण अखेर तिचं ऐकून मी भाग घेतला. बिग बॉसच्या घरात जवळपास तीन महिने राहिल्यानंतर माझ्यात बराच बदल झाला. मी केवळ अधिक प्रसिद्ध झालो नाही, तर माझ्या स्वभावात बराच नम्रपणा आला”, असं ते पुढे म्हणाले.

2009 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत नगमाने अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “मला एक गोष्ट समजत नाही की तुमच्या सहकलाकारासोबत चांगली मैत्री झाली तर काय बिघडलं? आम्ही एकमेकांसोबत कम्फर्टेबल असलो तर त्यात काय चुकीचं आहे? पडद्यावर आम्ही पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे कॅमेऱ्याच्या मागेही तुम्हाला कम्फर्ट लेव्हलची गरज असते”, असं ती म्हणाली होती.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.