धोनीसोबत रिलेशनमध्ये होती साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री; ब्रेकअप नंतर म्हणाली “आमचे नाते म्हणजे माझ्यासाठी डाग”

एका प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीने महेंद्रसिंग धोनी आणि तिच्या कथित नातेसंबंधाबद्दल बरेच खुलासे केले. एका मुलाखती दरम्यान तिने धोनीबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या.

धोनीसोबत रिलेशनमध्ये होती साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री; ब्रेकअप नंतर म्हणाली आमचे नाते म्हणजे माझ्यासाठी डाग
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 8:01 PM

दक्षिण इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत प्रसिद्धी मिळवलेल्या राय लक्ष्मी कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. राय लक्ष्मी ही दक्षिण इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दक्षिण इंडस्ट्री व्यतिरिक्त राय लक्ष्मीने बॉलिवूडमध्येही बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र बॉलिवूडमध्ये तिला हवं तसं यश मिळालं नाही.

राय लक्ष्मी अन् धोनीच्या नात्याची तुफान चर्चा होती 

राय लक्ष्मी तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिली आहे. तिच्याबद्दल जास्त चर्चा तेव्हा केली गेली जेव्हा तिचे नाव महेंद्र सिंग धोनीसोबत जोडलं गेलं. राय लक्ष्मीने स्वतःच याबद्दल खुलासा केला होता. तिच्या आणि धोनीच्या नात्याविषयी फार कोणाला माहित नसल्याचेही तिने म्हटले होते.

राय लक्ष्मीने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तिने तमिळ चित्रपटांमध्ये पदार्पण केले, त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. राय लक्ष्मीचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला आणि त्यानंतर हळू हळू तिने मॉडेलिंगमध्ये करिअर केलं. राय लक्ष्मीचे नाव अनेक अभिनेते आणि कलाकारांशी जोडलं गेलं आहे. मात्र महेंद्रसिंग धोनीबरोबर तिचं नाव बऱ्याच काळापर्यंत चर्चेत होतं. महेंद्रसिंग धोनीने मात्र राय लक्ष्मी आणि त्याच्या नात्यावर कधीही भाष्य़ केलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Raai Laxmi (@iamraailaxmi)

राय लक्ष्मीने महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठा खुलासा

दरम्यान एका मुलाखतीमध्ये राय लक्ष्मीने महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठा खुलासा केला होता. महेंद्रसिंग धोनीने त्यांच्य़ा नात्याविषयी कधीही काही बोलला नसल्याचे तिने म्हटले होते. इतकेच नव्हे तर राय लक्ष्मीने महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा फायदा घेतला अशीही चर्चा रंगली होती. मात्र राय लक्ष्मीने कधीही याला दुजोरा दिला नाही. असंही म्हटलं जातं की त्यांच्या ब्रेकअपनंतर राय लक्ष्मीने बराच गोंधळ केला होता.त्यामुळे बरीच चर्चाही झाली होती.

“धोनीसोबतचे नाते म्हणजे डाग…”

राय लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, तिची आणि महेंद्रसिंग धोनीची 2008 च्या आयपीएलमध्ये भेट झाली होती आणि त्यानंतर दोघांची चांगली मैत्रीही झाली. राय लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले होतं पण नंतर वादामुळे त्यांचे नातं तुटले. तथापि, राय लक्ष्मीशी असलेल्या संबंधांच्या वृत्ताची महेंद्रसिंग धोनीने कधीही मान्यता दिली नाही, किंवा कधीही त्यावर कोणतेही भाष्य केले नाही.

राय लक्ष्मीने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, धोनीनंतर तिने तीन जणांना डेट केले होते, परंतु अद्यापही तिचे नाव धोनीशीच जोडले जाते. राय लक्ष्मीने हे नाते म्हणजे तिच्या आयुष्यावर असलेली हा डाग म्हटलं होतं जो पुसण्याची ती वाट पाहत आहे. धोनी व्यतिरिक्त, राय लक्ष्मीने क्रिकेटर एस श्रीसंतनलाही डेट केलं होतं.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.