70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, ‘हा’ अभिनेता ठरला सर्वोत्कृष्ट, वाचा पूर्ण यादी
नुकताच आता 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा ही करण्यात आलीये. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांनी या पुरस्कारांमध्ये धमाका केल्याचे बघायला मिळतंय. परत एकदा साऊथ चित्रपटांचा यामध्ये दबदबा बघायला मिळाला.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकताच करण्यात आलीये. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही नावे घोषित करण्यात आली आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कलाकारांचा गाैरव हा केला जाणार आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून कांताराला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रिषभ शेट्टी याला पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नित्या मेनन हिला मिळाला असून चित्रपट कच्छ एक्सप्रेसला हा पुरस्कार मिळालाय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुरज बर्जाद्या मिळाला असून चित्रपट उंचाईसाठी हा पुरस्कार मिळालाय.
मराठी चित्रपट वाळवीला देखील 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार मिळालाय. नौशाद सदर खानला या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार देण्यात आला. फौजा चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय. अट्टम या मल्याळम चित्रपटाला 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला आहे.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाल्याने त्याच्यावर काैतुकांचा जोरदार वर्षाव होताना दिसत आहे. अभिनेत्याला शुभेच्छा देताना लोक दिसत आहे. ऋषभ शेट्टी याला हा पुरस्कार कांतारा चित्रपटासाठी मिळाला आहे. यासोबतच अजूनही काही पुरस्कार हे कांतारा चित्रपटाला मिळाली आहेत.
बॉलिवूड चित्रपट ब्रह्मास्त्र याला देखील या पुरस्कार मिळालाय. र्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार प्रीतमला ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी मिळाला आहे. पोन्नियिन सेलवन 1 चित्रपटाला तामिळमधील बेस्ट चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. कार्तिकेय 2 चित्रपटाला तेलगूमधील बेस्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. KGF Chapter 2 ला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
मनोज बाजपेयी यांना गुलमोहरसाठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला आहे. सूरज बडजात्या यांना ‘उंचाई’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. नीना गुप्ता यांना पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. पवन मल्होत्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.