बॉयफ्रेंडनंतर पतीकडून फसवणूक; अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतर आता करते असं काम?

अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली, पण खरं प्रेम तिला कधी मिळालं नाही... बॉयफ्रेंडने तर अभिनेत्रीला फसवलंच पण लग्नानंतर पतीने देखील..., आज एकटी राहून करते 'असं' काम

बॉयफ्रेंडनंतर पतीकडून फसवणूक; अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आल्यानंतर आता करते असं काम?
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 1:21 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहे, ज्यांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली. पण प्रेमात अभिनेत्रींची फसवणूक झाली. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री रीना रॉय (Reena Roy)… सिनेमांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्यानंतर रीना यांनी चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आजही त्यांच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. रीना यांना प्रोफेशन आयुष्यात चाहत्यांचं प्रेम आणि यश मिळालं, पण त्यांच्या खासगी आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, मात्र त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. बॉयफ्रेंडनंतर त्यांच्या पतीने देखील अभिनेत्रीची फसवणूक केली.

रीना रॉय यांनी लहानपणापासून अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. आई – वडिलांमध्ये सतत भांडणं होत असल्यामुळे त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. कुटुंब विभक्त झाल्यानंतर रीना रॉय यांची आर्थिक परिस्थिती ढासळली. अशात कुटुंबाची भूक भागवण्यासाठी रीना रॉय यांनी क्लॅबमध्ये डान्स करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

आयुष्यात कठीण परिस्थितीचा सामना करत असताना रीना रॉय यांच्यावर बी.आर. इशान यांची नजर पडली आणि त्यांनी रीना यांना बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर रीना रॉय यांनी अभिनयास सुरुवात केली. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना रीना यांची ओळख स्वतःपेक्षा ११ वर्ष मोठे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत झाली.

रिपोर्टनुसार, शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर शत्रुघ्न सिन्हा यांनी रीना यांच्यासोबत असलेलं नातं संपवलं आणि पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्न केलं. या धक्क्यातून सावरायला रीना रॉय यांना बराच काळ लागला. याच दरम्यान अभिनेत्रीची ओळख पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटू मोहसिन खान यांच्यासोबत झाली आणि दोघांनी लग्न केलं.

पण लग्नानंतर देखील रीना रॉय यांना प्रेम मिळालं नाही. अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली, पण खरं प्रेम तिला कधी मिळालं नाही. लग्नानंतर रीना यांनी एका मुलीला जन्म दिला. पण मुलीच्या जन्मानंतर दोघांमध्ये वाद होवू लागले. अखेर रीना आणि मोहसिन खान यांचा घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर रीना मुलीला घेवून पुन्हा मुंबईमध्ये आल्या. आता रीना रॉय यांची एक्टिंग अकॅडमी आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.