Rekha | खरंच सेक्रेटरीसोबत रेखा आहेत ‘लिव्हइन रिलेशनशिप’मध्ये? अखेर मोठं सत्य समोर आलंच
सेक्रेटरी आणि रेखा खरंच तीस वर्षांपासून राहत आहेत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये? नक्की काय आहे त्यांच्या नात्याचं सत्य...? सध्या सर्वत्र रेखा आणि फरजाना यांच्या नात्याची चर्चा...
मुंबई | 23 जुलै 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रेखा आणि सेक्रेटरी फरजाना यांच्या नात्याच्या चर्चांनी तुफान जोर धरला आहे. एवढंच नाही तर, दोघे गेल्या तीस वर्षांपासून एकत्र राहत आहेत. अशी देखील चर्चा रंगत आहे. यासिर उस्मान लिखीत ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात आसा दावा करण्यात आल्याचं अनेकदा सांगण्यात आलं. पण खुद्द यासिर उस्मान यांनी एक सोशल मीडियावर एक पोस्ट करत सत्य सांगितलं आहे. सध्या सर्वत्र यासिर उस्मान यांची पोस्ट व्हायरल होत आहे. रेखा आणि सेक्रेटरी फरजाना यांच्यामध्ये कोणतेही खासगी संबंध नाहीत, असं यासिर उस्मान यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. ज्यामुळे रेखा आणि फरजाना यांच्या नात्याचं सत्य सर्वांसमोर आलं आहे.
सध्या रंगत असलेल्या सर्वा चर्चांना यासिर उस्मान यांनी पूर्णविराम दिला आहे आणि रेखा – फरदाना यांचं नातं फेटाळलं आहे. ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकात रेखा आणि फरजाना रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. पण यावर यासिर उस्मान यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. एवढंच नाही कायदेशीर कारवाई करण्याची ताकीद देखील यासिर उस्मान यांनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
यासिर उस्मान पोस्टमध्ये म्हणतात, ‘रेखा द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकाच्या आधारावर रिलेशनशिपसंबंधी व्हायरल होणाऱ्या लेखांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांना वादग्रस्त पद्धतीत मांडण्यात आलं आहे. सध्या माध्यमांमध्ये ज्या चर्चा रंगत आहेत, त्याबद्दल मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं नाही. एवढंच नाही तर, मी पूर्ण पुस्तकात कुठेही लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लैंगिक संबंधांचा वापर केलेला नाही.’
It’s despicable how clickbait journalism has an aversion towards verifying facts. And most often they target women. A statement. pic.twitter.com/sYBCZxLsp9
— ?????? ????? (@yasser_aks) July 22, 2023
रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम देत ‘रेखा द अनटोल्ड स्टोरी’ पुस्तकाचे लेखक म्हणाले, ‘जर ‘रेखा द अनटोल्ड स्टोरी पुस्तकावर लिहिलेले लेख दुरुस्त करण्यात आले नाहीत. तर आम्ही पब्लिकेशन्स विरोधात गंभीर कारवाई करण्यासाठी संकोच बाळगणार नाही…’ असं वक्तव्य यासिर उस्मान यांनी पोस्टमध्ये केलं आहे. सध्या त्यांची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहेत.
‘रेखा द अनटोल्ड स्टोरी’ रेखा यांच्या आयु्ष्यावर आधारित आहे. ‘सिलसिला’, ‘खून भरी मांग’, ‘उमराव जान’, ‘खिलाडीओ का खिलाडी’, ‘कोई मिल गया’, ‘दिल है तुम्हारा..’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्री रेखा यांनी महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. प्रोफेशनल आयुष्यात रेखा यशाच्या उच्च शिखरावर चढल्या, पण खासगी आयु्ष्यात मात्र रेखा यांना चढ – उतारांचा सामना करावा लागला.
आज रेखा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी सोशल मीडियावर मात्र कायम चर्चेत असतात. वयाच्या ६३ व्या वर्षी देखील रेखा यांचं सौंदर्य कमी झालेलं नाही. रेखा सिनेमांमध्ये दिसत नसल्या तरी पर्टी आणि अनेक कार्यक्रमांमध्ये दिसतात. तेव्हा रेखा यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.