Rekha यांचं किती वेळा झालंय लग्न, वयाच्या ६७ व्या वर्षीही राहतात एकट्याच पण का लावतात सिंदूर?

'या' अभिनेत्यासोबत रेखा यांचं गुपचूप लग्न, पण अभिनेत्याच्या आईमुळे तुटलं नातं...पैसा, प्रसिद्धी सर्व काही असूनही वयाच्या ६७ व्या वर्षी देखील एकट्याच... जाणून घ्या का लावतात सिंदूर?

Rekha यांचं किती वेळा झालंय लग्न, वयाच्या ६७ व्या वर्षीही राहतात एकट्याच पण का लावतात सिंदूर?
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 10:48 AM

मुंबई : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी त्यांच्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. असंख्य नव्या कलाकारांसाठी रेखा प्रेरणा स्थानी आहेत. अभिनय, सौंदर्य, डान्स, अदा… या सर्व गोष्टींमुळे रेखा यांनी फक्त चाहत्यांच्या मनावर नाही तर, अनेक सेलिब्रिटींच्या मनावर देखील राज्य केलं. एक काळ असा होता, जेव्हा रेखा यांचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. पण नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेली असते. रेखा यांना प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड यश मिळालं. पण खासगी आयुष्यात मात्र त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

‘दो अंजाने’ सिनेमाच्या सेटवर रेखा आणि अमिताभ बच्चन यांची ओळख झाली. मोठ्या पडद्यावर दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. खासगी आयुष्यात देखील दोघांमध्ये प्रेम बहरत होतं. अमिताभ बच्चन यांच्यावर रेखा प्रचंड प्रेम करत होत्या. पण बिग बी विवाहित असल्यामुळे दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी प्रेम कहाणी अधुरी राहिली.

rekha

अमिताभ बच्चन यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर रेखा यांनी उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांनी स्वतःला संपवलं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुकेश यांचा मृत्यू झाल्यामुळे रेखा यांना टीकेचा सामना करावा लागला. मुकेश यांच्या निधनानंतर रेखा यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली.

रेखा आणि विनोद मेहरा यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. शिवाय गुपचूप लग्न देखील केलं. पण विनोद यांच्या आईला रेखा पसंत नव्हत्या. रिपोर्टनुसार, विनोद यांच्या आईने रेखा यांना मारण्यासाठी चप्पल देखील हातात घेतली होती. ज्यामुळे रेखा यांनी विनोद यांना सोडण्याचा निर्णय घेतला. आईमुळे रेखा आणि विनोद मेहरा यांचं नात देखील तुटलं.

रेखा का लावतात सिंदूर?

रेखा यांच्या सिदूरबद्दल सांगायचं झालं तर, 1982 मध्ये जेव्हा रेखा ‘उमराव जान’ सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी आल्या होत्या तेव्हा तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांना विचारलं, ‘तुम्ही सिंदूर का लावता?’ यावर रेखा म्हणाल्या, ‘मी ज्या शहरातील आहे, त्याठिकाणी सिंदूर लावण्याची फॅशन आहे आणि मला सिंदूर लावयला आवडतं.. म्हणून मी लावते…’ रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्यातरी चाहत्यांमध्ये चर्चेत असतात.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...