Rekha | बऱ्याच वर्षांनंतर रेखा प्रेम-नातेसंबंधांविषयी मोकळेपणे झाल्या व्यक्त; म्हणाल्या “एकदा नातं जोडलं की..”

'वोग' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रेखा त्यांच्या करिअरविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. त्याचसोबत त्यांनी प्रेम आणि रिलेशनशिप यावरही भाष्य केलं. 2014 नंतर चित्रपटांमध्ये भूमिका का साकारली नाही, यामागचं कारण त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.

Rekha | बऱ्याच वर्षांनंतर रेखा प्रेम-नातेसंबंधांविषयी मोकळेपणे झाल्या व्यक्त; म्हणाल्या एकदा नातं जोडलं की..
RekhaImage Credit source: Instagram/ Vogue
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 10:10 AM

मुंबई : एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेखा यांनी नुकतंच ‘वोग अरेबिया’ या मासिकासाठी फोटोशूट केलं. त्यांच्या फोटोशूटचे फोटो ‘वोग’कडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये रेखा यांचा रॉयल लूक थक्क करणारा आहे. या फोटोशूटमध्ये पुन्हा एकदा रेखा यांच्या भांगेतील सिंदूरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘वोग’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रेखा त्यांच्या करिअरविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. त्याचसोबत त्यांनी प्रेम आणि रिलेशनशिप यावरही भाष्य केलं. 2014 नंतर चित्रपटांमध्ये भूमिका का साकारली नाही, यामागचं कारण त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं.

रेखा यांचं करिअर

रेखा यांनी ‘इन्टी गुट्टू’ (1958) या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांची पहिली भूमिका ‘ऑपरेशन जॅकपॉट नल्ली सीआयडी 999’ (1969) या चित्रपटात होती. 1970 मध्ये त्यांनी ‘सावन भादों’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर ‘सुपर नानी’ या चित्रपटानंतर त्यांनी फारशा भूमिका साकारल्या नाहीत. त्यानंतर त्या फक्त मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसल्या.

हे सुद्धा वाचा

2014 नंतर चित्रपट का केले नाहीत?

‘वोग अरेबिया’शी बोलताना रेखा म्हणाल्या, “मी चित्रपट बनवत असले किंवा नसले तरी चित्रपटांनी मला कधीच सोडलेलं नाही. मी ज्यावर प्रेम करते, त्याच्या खूप सुंदर आठवणी माझ्याकडे आहेत. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा योग्य प्रोजेक्ट स्वत:हून मला शोधत येईल. माझी व्यक्तीरेखा ही माझीच आहे, पण माझी सिनेमॅटिक व्यक्तीरेखा पाहणाऱ्याच्या नजरेत आहे. त्यामुळे मला कुठे असायला हवं आणि कुठे नको हे मी निवडते. मला जे आवडतं ते निवडण्याचा अधिकार आणि नाही म्हणण्याचं सौभाग्य मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.”

View this post on Instagram

A post shared by Vogue Arabia (@voguearabia)

या मुलाखतीत रेखा प्रेमाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाल्या. “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या गोष्टीवर इतकं मनापासून प्रेम करता, तेव्हा ते प्रेम नाहीसं होतं का”, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रेखा पुढे म्हणाल्या, “नाही. नातं एकदा प्रस्थापित झालं की ते कायमचं असतं. कधीकधी आपल्याला त्यातून अधिक काहीतरी हवं असतं तर कधीकधी जेवढं आहे तेच पुरेसं वाटतं. ही गोष्ट माझ्या कलेसाठीही लागू होते. मी सौंदर्याप्रती असलेल्या चिकाटीच्या वृत्तीने जन्माला आले. नक्कीच माझा जन्म अभिनेत्री होण्यासाठी झाला. पण ही माझी शिकण्याची अतृप्त शोध, माझे डोळे आणि हृदय सतत नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी तयार ठेवण्याची माझी इच्छा, नकारात्मकतेने नाही तर सकारात्मकतेने सौंदर्य आत्मसात करणं, या सर्व गोष्टींमुळे मला माझ्या कलेवर प्रभुत्त्व मिळवता येतं. मला दररोज नवोदित कलाकार असल्यासारखं वाटतं. जे माझ्याप्रमाणेच वचनबद्धता दाखवतात, त्यांच्यावर माझा विश्वास आहे.”

रेखा या नुकत्याच ‘गुम है किसी के प्यार में’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये झळकल्या होत्या. स्टार प्लस वाहिनीवरील या लोकप्रिय मालिकेचं प्रमोशन रेखा यांच्याकडून केलं जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.