अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच रेखा यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘मला विचारा…’,
Rekha - Amitabh bachchan | अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच अशी होती रेखा यांची प्रतिक्रिया..., म्हणाल्या, 'मला विचारा...'
बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम खासगी आयुष्यामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात. वयाच्या 70 व्या वर्षी देखील रेखा यांचं सौंदर्य कमी झालेलं नाही. रेखा यांच्या सौदर्यापुढे बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री देखील फेल आहे. सांगायचं झालं रेखा यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता रेखा लवकरच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये दिसणार आहेत. एवढंच नाही तर, शोमध्ये त्यांना महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, कपिल शर्माच्या शोच्या शोमध्ये एन्ट्री करतात आणि म्हणतात, ‘माझ्यावर मनापासून प्रेम करणारे चाहते… जिथे प्रेम आहे, तिथे मी आहे… आपल्याला तर भेटायचंच होतं…’ असं रेखा म्हणाल्या… पुढे कपिल म्हणाला, ‘मॅम तुमचं सौंदर्य तर पाहा… तुमच्या सौंदर्यावर अनेक जण घायाळ आहेत…’
पुढे रेखा म्हणतात, ‘मी आता 70 वर्षांची झाली आहे….’ रेखा कपिलला विनोदी अंदाजात म्हणाल्या, ‘मी 17 वर्षांची आहे… असं तुला ऐकू आलं…’, आता चाहते देखील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या आगामी भागाच्या प्रतीक्षेत आहेत…
अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच रेखा यांची प्रतिक्रिया
शोमध्ये कपिल ‘कोन बनेगा करोडपती’ शो मधील एक किस्सा सांगतो.. ‘आम्ही बिग बींसोबत केबीसी खेळत होतो. माझी आई देखील सोबत होती. तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले, ‘देवी जी… काय खाऊन जन्म दिला आहे…’ यावर कपिलच्या आई म्हणाल्या, ‘दाल रोटी…’
पण कपिल ‘दाल रोटी’ म्हणायच्या आधिक रेखा म्हणाल्या ‘दाल रोटी…’, यावर रेखा म्हणाल्या, ‘मला विचारा ना… एक एक डायलॉग मला माहिती आहे…’, रेखा यांची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, रेखा कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. आज वयाच्या 69 व्या वर्षी देखील रेखा एकट्याच आयुष्य जगत आहेत. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा रेखा आणि बिग बी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता.