अमिताभ बच्चन यांना पुरस्कार जाहीर होताच रेखा यांनी मारली जया बच्चन यांना मिठी, पहा व्हिडीओ
अभिनेत्री रेखा आणि जया बच्चन यांना एकाच फ्रेममध्ये पाहिल्यानंतर चर्चांना उधाण येणार नाही, असं होऊच शकत नाही. एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये रेखा आणि जया एकमेकींना मिठी मारताना दिसून येत आहेत.
एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या रेखा आणि जया बच्चन या दोन्ही अभिनेत्रींना एकाच फ्रेममध्ये पाहणं चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. या दोघींच्या नात्याचा इतिहास आणि अमिताभ बच्चन यांच्याशी असलेलं नातं यांमुळे रेखा आणि जया कधीही एकमेकींसमोर आल्या की सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळतात. असे क्षण टिपण्यासाठी कॅमेरामॅनही उत्सुक असतात. असाच एक दुर्मिळ क्षण एका पुरस्कार सोहळ्यात पहायला मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात अमिताभ आणि जया बच्चन एकत्र पोहोचले होते. तिथे रेखासुद्धा उपस्थित होत्या. या पुरस्कार सोहळ्यात अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जेव्हा ते मंचावर पुरस्कार स्वीकारायला गेले, तेव्हा आनंदाने रेखा यांनी जया यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठी मारली.
रेखा आणि जया यांचा हा व्हिडीओ 2015 मधील स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्यातील आहे. या पुरस्कार सोहळ्यात अमिताभ बच्चन यांना त्यांच्या ‘पिकू’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्याप्रकारे रेखा यांनी आनंद व्यक्त केला, तो पाहण्याजोगा होता. विजेते म्हणून अमिताभ बच्चन यांचं नाव जाहीर होताच जया आणि रेखा या दोघी त्यांच्या जागेवरून उठून उभ्या राहिल्या. त्यानंतर बिग बी मंचावर ट्रॉफी घ्यायला गेले, तेव्हा रेखा अचानक जया यांच्याकडे आल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्यांनी प्रेमाने जया यांना मिठीसुद्धा मारली होती. त्यानंतर बिग बी पुरस्कार स्वीकारताना दोघी एकमेकींच्या बाजूला उभ्या राहिल्या होत्या.
पहा व्हिडीओ
At First glance I thought it was Edited 😅 byu/Chai_Lijiye inBollyBlindsNGossip
हे सुद्धा वाचा
बॉलिवूडमधील या तिनही प्रतिष्ठित कलाकारांमधील इतिहास आणि नातं लक्षात घेता हा क्षण महत्त्वपूर्ण ठरला होता. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी ‘मिस्टर नटवरलाल’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘गंगा की सौगंध’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. मात्र या सर्वांत ‘सिलसिला’ या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. 1981 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यामध्ये जया बच्चन यांनीसुद्धा भूमिका साकारली होती.
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी तर जगजाहीर आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी या दोघांच्या लव्ह-स्टोरीची जोरदार चर्चा होती. या दोघांमध्ये सिक्रेट प्रेम होतं, असं म्हटलं जातं. चित्रपटांमध्ये एकत्र काम करतानाच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 1976 मध्ये ‘दो अंजाने’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांना डेट करू लागले, असं म्हटलं जातं. त्याकाळी सर्व वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये अमिताभ आणि रेखा यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या बातम्या झळकत होत्या.