Rekha | ‘महिलेसोबत लग्न करण्यासाठी…?’, रेखा यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ
'महिलेसोबत लग्न करणार का?' या प्रश्नाला रेखा यांनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वत्र खळबळ... सर्वत्र रेखा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...
मुंबई | अभिनेत्री रेखा कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आज रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी, त्यांची चर्चा मात्र कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. एव्हरग्रीन सौंदर्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रेखा. आज देखील अभिनेत्री रेखा प्रचंड सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्यापूढे बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींचं ग्लॅमर देखील फेल आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी देखील त्या प्रचंड सुंदर दिसतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा यांच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. रेखा यांना प्रोफेशनल आयुष्यात यश तर मिळालं पण, त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र अनेक चढ – उतार आले.
महानाटक अमिताभ आणि रेखा यांचं नातं तुटल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक मुकेश अग्रवाल (Mukesh Aggarwal) यांच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही… असं सांगण्यात येतं. रेखा यांनी सेमी ग्रेवाल यांच्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन सोडलं.
शोमध्ये सेमी ग्रेवाल यांनी रेखा यांना लग्नाबद्दल देखील विचारलं. यावर रेखा म्हणाल्या, ‘एका पुरुषासोबत लग्न? असं विचारत आहात का तुम्ही..’ रेखा यांच्या प्रतिक्रियेवर सेमी ग्रेवाल देखील हैराण झाल्या आणि म्हणाल्या, ‘हो पुरुषासोबत लग्न… महिलेसोबत तर करणार नाही ना लग्न?’ यावर रेखा म्हणाल्या, ‘महिलेसोबत लग्न करण्यास काय हरकत आहे…’ रेखा यांच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ माजली होती.
अखेर रेखा यांनी लग्नाचा कोणताही विचार नाही… असं देखील विनोदी अंदाजात सांगितलं. सांगायचं झालं तर, रेखा यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मुकेश अग्रवाल डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगण्यात आलं. अखेर होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली.
रेखा यांच्या आयुष्यात अनेक सेलिब्रिटी आले, पण कोणासोबत नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यानंतर रेखा यांनी १९९० मध्ये उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं. पण मुकेश आणि रेखा यांचं नातं फक्त तीन महिने टिकलं. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर मुकेश आणि रेखा यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मुकेश यांनी स्वतःचं जीवन संपवलं. आता रेखा सर्वकाही असूनही एकट्या आयुष्य जगत आहेत.