‘अमिताभ बच्चन यांनी नातं ठेवलं नाही, कारण….’, सलीम खान यांच्यासोबत बिग बींचे असलेले संबंध अखेर समोर आलेच

बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध सेलिब्रिटी सलीम खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्यामध्ये कसे आहेत संबंध; १९७३ साली प्रदर्शित झालेल्या 'जंजीर' सिनेमाच्या यशानंतर अनेक वर्षांनी सलीम खान स्पष्टच म्हणाले...

'अमिताभ बच्चन यांनी नातं ठेवलं नाही, कारण....', सलीम खान यांच्यासोबत बिग बींचे असलेले संबंध अखेर समोर आलेच
सलीम खान आणि महानायक अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 10:43 AM

Salim Khan And Amitabh Bachchan : सलीम खान (salim khan) आणि जावेद अख्तर यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ सिनेमातून बॉलिवूडला एक ‘एंग्री यंग मॅन’ दिला. ‘जंजीर’ सिनेमामुळे सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यासोबतच महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्या करियरला देखील वेगळी दिशा मिळाली. नुकताच सलीन खान यांनी मुलगा आणि अभिनेता अरबाज खान याच्या शोमध्ये बिग बींसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. जावेद अख्तर यांच्यासोबत संपर्क तुटल्यानंतर सलीम खान आणि बिग बी यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाला. (amitabh bachchan salim khan movies)

सलीम खान यांनी ‘जंजीर’साठी सर्व प्रथम धर्मेंद्र, देव आनंद आणि दिलीप कुमार यांना सिनेमाची स्क्रिप्ट पाठवली, पण त्यांनी सिनेमा करण्यास नकार दिला. त्यानंतर सिनेमाची स्क्रिप्ट अमिताभ बच्चन यांना देण्यात आली. पण सिनेमा करण्यासाठी एकही अभिनेत्री तयार नव्हती. त्यानंतर सलीम यांनी अभिनेत्री जया भादुरी यांना सिनेमात काम करण्यासाठी विनंती केली.

पण जया भादुरी यांनी देखील सिनेमात काम करण्यासाठी नकार दिला. अखेर सिनेमात अभिनेत्री जया बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली. पुढे सलीम खान म्हणाले, ‘अमिताभ बच्चन प्रोफेशनल होते. बिग बींच्या अभिनयावर विश्वास असल्यामुळे कायम त्यांच्या नावाची कायम निवड करायचो. पण जावेद अख्तर यांच्यापासून वेगळं झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी देखील संबंध तोडले.’

‘नातं कायम ठेवण्याची जबाबदारी बिग बींवर देखील होती. पण काही कारणांमुळे त्यांनी तसं केलं नाही.’ जावेद अख्तर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर सलीम खान आणि अमिताभ बच्चन यांनी १९८९ साली प्रदर्शित झालेल्या तूफान सिनेमात एकत्र काम केलं. सलीम खान यांनी सांगितलं की, ‘अमिताभ बच्चन प्रोफेशनल होते. पण ते कधी मित्र झाले नाहीत.’

‘मी कधी असं दाखवलं नाही की मी त्यांचा चांगला मित्र आाहे. त्यांचा स्वभाव फक्त माझ्यासाठी असा नव्हता. पण त्यांनी कधी कोणासोबत नातं घट्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी कायम प्रोफेशनली काम केला. त्यांनी प्रचंड उत्तम काम केलं..’ असं देखील सलीम खान यांनी मुलगा अजबाज खान याच्या शोमध्ये बोलून दाखवलं.

सांगायचं झालं तर, सलीम खान आणि अमिताभ बच्चन देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र बिग बींच्या अभिनयाचं कौतुक सर्वत्र व्हायचं. आज देखील त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियाच्या माध्यामातून बिग बी कायम चाहत्यांच्या संपर्कात असतात.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.