अभिषेक बच्चन सोबत अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चा, ‘ती’ आहे इतक्या कोटींची मालकीण
Abhishek Bachchan: 'या' अभिनेत्रीसाठी अभिषेक बच्चन देणार ऐश्वर्या राय हिला घटस्फोट? 'ती' अभिनेत्री आहे इतक्या कोटींची मालकीण... गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेकच्या खासगी आयुष्याची चर्चा...
अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे अभिषेक याच्या अफेअरची चर्चा अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत सुरु आहे. पण यावर अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिषेक सोबत नावाची चर्चा होत असल्यामुळे निम्रत हिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. निम्रत वयाच्या 42 व्या वर्षी देखील अविवाहित आहे.
निम्रत कौर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 12 व्या वर्षी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. काश्मीरमधील बंडखोर लोकांनी अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या केली. या घटनेनंतर निम्रतच्या कुटुंबियांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. घटनेनंतर अभिनेत्री कुटुंबासोबत दिल्लीत आली.
दिल्लीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निम्रत मॉडेलींगसाठी भारतात आली. मॉडेल म्हणून निम्रतने करियरची सुरुवात केली. मॉडेलींगला सुरुवात केल्यानंतर निम्रत हिला अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण अभिनेत्रीची खरी आवड थिएटरमध्ये होती. निम्रतने बगदाद वेडिंग आणि रेड स्पॅरो सारख्या नाटकांमध्ये काम केले.
अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर निम्रत हिने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या वन नाइट विद द किंग सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पेडलर्स’ सिनेमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये वाढ झाली.
अनेक सिनेमांमध्ये भूमिका बजावल्यानंतर ‘लंचबॉक्स’ सिनेमातून अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली. त्यानंतर अभिनेत्रीने अभिषेक बच्चन याच्यासोबत ‘दसवी’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली. सिनेमात निम्रत, अभिषेकच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली.
अभिनेत्री निम्रत कौर हिच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 7 कोटी रुपयांची मालकीण असल्याची माहिती समोर येत आहे. निम्रत हिने बॉलिवूड शिवाय अनेक हॉलिवूड सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.
अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिषेक बच्चन हिच्यापूर्वी निम्रतचं नाव माजी भारतीय क्रिकेटर रवी शास्त्री यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही अशी भूमिका दोघांनी मांडली होती. आता निम्रत अभिषेक बच्चन याच्यामुळे चर्चेत आली.