Welcome Back | रेमो डिसूझाचे घरी जोरदार स्वागत, व्हिडिओ पाहून चाहते मात्र चिंतेत

रेमो डिसूझा हॉस्पिटलमधून आता घरी आला आहे. रेमोचे घरी जोरदार स्वागत देखील करण्यात आले.

Welcome Back | रेमो डिसूझाचे घरी जोरदार स्वागत, व्हिडिओ पाहून चाहते मात्र चिंतेत
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 1:47 PM

मुंबई : रेमो डिसूझा हॉस्पिटलमधून आता घरी आला आहे. रेमोचे घरी जोरदार स्वागत देखील करण्यात आले. रेमोने त्याच्या कमबॅकचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो टीशर्ट आणि लोवरमध्ये दिसत असून त्याच्या हातात बलून दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना रेमोने लिहिले की, ‘तुम्ही सर्वांनी प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. या सुंदर स्वागतासाठी गैब्बी आणि माझ्या मित्रांचेही आभार’ (Remo D’Souza went home from the hospital but the fans got nervous)

View this post on Instagram

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रेमोच्या घरी परत येण्यावर चाहत्यांबरोबरच सेलेब्रिटी खूप खूश आहेत. नृत्यदिग्दर्शक गीता कपूरने रेमोच्या घरी येण्याचा आनंद व्यक्त केला आहे. गीता म्हणाली की, ‘मी खूप आनंदी आहे, रेमो घरी आला नेहमी निरोगी आणि आनंदी राहा ‘ त्याचवेळी टेरेंस लुइसने लिहले की, ‘या व्हिडिओने माझा दिवस बनविला. तुम्हाला तुमच्या कुटूंबासह घरी पाहून आनंद झाला. मी लवकरच तुला भेटायला येत आहे कारण आता मी घरी आलो आहे.’

बाकी सेलेब्रिटींनीही रेमोच्या व्हिडिओवर कॅमेंट केल्या आहेत. मात्र, रेमोचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर रेमोच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. कारण या व्हिडिओत रेमो खूप अशक्त दिसत आहे. नेहमीच फिट असणाऱ्या रेमोला असे बघून चाहते चिंतेत आहेत. रेमो डिसूझावर एंजियोप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे.

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हृदयविकाराचा झटका आला होता. लीजेलने रुग्णालयातील रेमोचा एक व्हिडिओ शेअर केला होता.  ज्यामध्ये तो खुर्चीवर बसून पायावर डान्स करताना दिसत होता.  व्हिडिओ शेअर करताना लीझेलने लिहिले होते की, पायांनी नाचणे वेगळे आणि हृदयातून नाचणे वेगळे तुमच्या प्रार्थना आणि आशिर्वादासाठी धन्यवाद. लीजेलच्या या पोस्टवर वरुण धवनेही कॅमेंट केली होती. मात्र, रेमोचा तो व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. आणि रेमोच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला देखील होता.

रेमो डिसूझा यांचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव असे त्याचे खरे नाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझा यांनी गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. शाळेच्या दिवसांत तो खूप चांगले खेळाडू होते. त्यावेळी त्यांना अनेक मोठे पुरस्कारही मिळाले होते. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. त्यांना ध्रुव आणि गबिरिल हे दोन मुलगे देखील आहेत.

संबंधित बातम्या : 

रेमो डिसूझाच्या प्रकृतीत सुधारणा, नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांनी दिली माहिती

Remo D’Souza | पैशांची फसवणूक, रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल!

(Remo D’Souza went home from the hospital but the fans got nervous)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.