रेणुका शहाणेंना 10 व्या वर्षी आली मासिक पाळी; म्हणाल्या, ‘आयुष्यातील मोठा काळ मासिक पाळी…’
Renuka Shahane on Periods: 'वयाच्या 10 व्या वर्षी मासिक पाळी आली, आज मी 58 वर्षांची... आयुष्यातील मोठा काळ...', मासिक पाळीबद्दल रेणुका शहाणे यांचा मोठा खुलासा..., मासिक पाळी आल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांबाबत देखील अभिनेत्री म्हणाल्या...
अभिनेत्री रेणुका शहाणे कायम महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असतात. शिवाय रेणुका स्वतःचे अनुभव देखील चाहत्यांना सांगत असतात. आता देखील रेणुका यांनी स्वतःबद्दल फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. रेणुका यांना वयाच्या 10 व्या वर्षी मासिक पाळी आली होती. ज्यामुळे रेणुका यांच्या मनात अनेक प्रश्न आणि समस्यांनी जन्म घेतला. रेणुका शहाणे म्हणाल्या होत्या, ‘वयाच्या 10 व्या वर्षी मला पहिली मासिक पाळी आली. आज मी 58 वर्षांची आहे. मी माझ्या आयुष्यातील मोठा काळ मासिळ पाळी मध्ये घालवला आहे… आयुष्यातील अनेक गोष्टी मासिक पाळीत केल्या आहेत.’
‘इतक्या कमी वयात आपल्या शरीरात काय बदल होतात, मला काहीही कळत नव्हतं. पण मी भाग्यशाली होती माझ्या आईने मला सर्वकाही सांगितलं होतं. माझ्या घरात मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने चर्चा व्हायची. पण मला काहीही कळत नव्हतं. फक्त इतकं माहिती होतं की, काही वाईट होत नाहीये किंवा मी पीडित नाहीये…’
‘माझ्या शाळेत देखील माझ्या मैत्रिणींना मासिक पाळी आली नव्हती. म्हणून मासिक पाळीबद्दल त्यांना सांगण्यासाठी मला काही काळ प्रतीक्षा करावी लागली होती. त्यांना देखील मासिक पाळी सुरु झाल्यानंतर आमच्यामध्ये चर्चा होऊ लागली… ज्यासाठी मसा तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागली…’
‘मला खूप एकटं – एकटं वाटायला लागलं होतं, मी माझ्या आईसोबत बोलायची पण त्याचा माझ्या मनावर काही फरक पडला नाही. कारण तुमच्या शारीरात देखील बदल होत असतात आणि होणाऱ्या बदलांबद्दल शाळेत बोलू शकत नाही… काही तरी सर्वांपासून लपवावं लागत आहे… असं मला वाटायला लागलं होतं.’ असं देखील रेणुका शहाणे म्हणाल्या होत्या.
रेणुका शहाणे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, मराठी आणि हिंदी सिनेविश्वात रेणुका शहाणे हे नाव फार मोठं आहे. रेणुका यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता सलमान खान यांसारख्या सेलिब्रिटींसोबत देखील रेणुका यांनी काम केलं आहे. रेणुका यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.