त्यांना मत देऊ नका, अभिनेत्री रेणुका शहाणे संतापल्या, पोस्ट तुफान व्हायरल
Renuka Shahane | फेसबूक - मराठी माणसांसोबत दुजाभाव... घरं नाकारणाऱ्यांना...; निवडणुकीच्या वातावरणात रेणुका शहाणे यांची पोस्ट चर्चेत, म्हणाल्या, '...यांना मत देऊ नका', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रेणुका शहाणे यांच्या ट्विटची चर्चा... नेटकऱ्यांकडून देखील संताप व्यक्त...
अभिनेत्री रेणुका शहाणे कायम महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असतात. आता देखील रेणुका शहाणे यांनी मराठी माणसांसोबत होत असलेला दुजाभाव आणि निवडणुकीच्या वातावरणात जनतेच्या बहुमूल्य मतांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एका कंपनीने मुंबईत नोकऱ्यांची संधी असताना देखील मराठी उमेदवारांना अर्ज करण्यास परवानगी नाही.. असं स्पष्ट शब्दात लिहिलं होतं. पोस्टमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. मराठी माणसांसोबत होत असलेल्या दुजाभावावर रेणुका शहाणे यांनी विरोध केला आहे.
रेणुका शहाणे ट्विट करत म्हणाल्या, ‘मराठी “not welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका…मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका..’ सध्या त्यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मराठी “not welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका 🙏🏽 मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका 🙏🏽 ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला…
— Renuka Shahane (@renukash) May 7, 2024
पुढे रेणुका शहाणे म्हणाल्या, ‘ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका… कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे…’ त्यांच्या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
रेणुका शहाणे यांच्या ट्विटवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाल्या, ‘भूमिका घेतल्याबद्दल आभार रेणुका ताई…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘रेणुका ताई आभार…’ अनेकांनी रेणुका शहाणे यांचा विरोध देखील केला. आधी हिंदी सिनेमांमध्ये काम करणं थांबवा.. असं म्हणत अनेकांना रेणुका शहाणे यांचा विरोध देखील केला आहे.