Manipur | ‘आता खोटी कारवाई करावी लागेल..’; मणिपूर प्रकरणावरून सेलिब्रिटींनी सरकारला फटकारलं

मणिपूर हिंसाचाराची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. "दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात येत असल्याचा व्हिडीओ अस्वस्थ करणारा असून केंद्र आणि राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करेल", असं न्यायालयाने बजावलं.

Manipur | 'आता खोटी कारवाई करावी लागेल..'; मणिपूर प्रकरणावरून सेलिब्रिटींनी सरकारला फटकारलं
Varun Grover and Renuka ShahaneImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 10:02 AM

मुंबई | 21 जुलै 2023 : मणिपूरमधील दोन महिलांच्या नग्न धिंड प्रकरणाचे देशभर पडसाद उमटत आहेत. मणिपूरमध्ये जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचा व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले. गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराबाबत मौन बाळगलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर पहिल्यांदाच भाष्य करत अत्याचाऱ्यांना कदापि माफ करणार नाही, असा इशारा दिला. 4 मे रोजीचा हा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी त्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. त्यावर आता सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या अटकेच्या कारवाईवर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी ट्विट केलं आहे.

‘जेव्हा रक्षकच भक्षकच बनतात, तेव्हा न्याय मिळणं अशक्य आहे. 4 मे रोजी ज्यांच्या देखरेखीखाली हा जघन्य अपराध घडला, ते अचानक जागे झाले आणि त्यांनी त्या हजारो पापी लोकांपैकी एकाला अटक केली. जेणेकरून लोकांना या लाजिरवाण्या दुष्कृत्याचा विसर पडेल. त्यांचा विवेक मेला आहे. निर्लज्जपणा जिंदाबाद’, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

बिग बॉस फेम अली गोणीने या घटनेवर ट्विट करत लिहिलं, ‘ज्या देशात महिलांना सर्वांत मोठा दर्जा दिला जातो, त्याच देशात हे सर्व घडतंय. अंत जवळ आला आहे.’ लेखक वरुण ग्रोवरनेही याप्रकरणी ट्विट करत निंदा केली आहे. ‘त्यांच्या राजवटीत जमाव हिंसा शिगेला पोहोचली आहे, याची त्यांना अजूनही लाज वाटत नाही. इंटरनेट बंद असतानाही त्यांना पाठिंबा देणाऱ्या जमावाच्या गैरकृत्यांचा व्हिडीओ समोर आला असून आता त्यांच्यावर खोटी कारवाई करावी लागेल, याचा त्यांना राग आहे’, अशा शब्दांत त्याने फटकारलं आहे.

मणिपूर हिंसाचाराची स्वत:हून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारलं. “दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात येत असल्याचा व्हिडीओ अस्वस्थ करणारा असून केंद्र आणि राज्य सरकारने ठोस कारवाई करावी, अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करेल”, असं न्यायालयाने बजावलं.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.