पलक तिवारीचा काळ्या रंगाचा जॅकेट, इब्राहिम अली खानचा संताप… काय आहे कनेक्शन?
Palak Tiwari -Ibrahim Ali Khan: इब्राहिम अली खान याच्या हातात असलेला पलक तिवारी हिचा जॅकेट आणि त्याचा संताप..., नक्की काय आहे कनेक्शन? जाणून तुम्हीही व्हाल हैराण..., पलक तिवारी - इब्राहिम अली खान खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...
अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या लेरक पलक तिवरी हिला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे. इब्राहिम आणि पलक यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. पण पलक – इब्राहिन यांनी सर्वांसमोर नात्याची कबुली दिलेली नाही. कधी मूवी डेट तर कधी इब्राहिम याच्या घरातून निघालेल्या पलक हिला अनेकदा कॅमेऱ्यात कैद देखील करण्यात आलं आहे.
सांगायचं झालं तर, पलक आणि इब्राहिम यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझी आणि चाहत्यांची गर्दी जमते. एकदा इब्राहिम याला पाहिल्यानंतर पापाराझींची गर्दी जमली. एका सिनेमागृहाच्या बाहेर इब्राहिम याला स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा इब्राहिम फोनवर कोणाशीतरी बोलत होता. ‘याठिकाणी मीडिया आहे आणि माझ्या भोवती गर्दी करून उभे आहेत..’ असं म्हणताना इब्राहिम याला स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर इब्राहिम याला ट्रोल देखील करण्यात आलं होतं.
रिपोर्टनुसार, याच दरम्यान इब्राहिम याच्या हातात एक जॅकेट होता आणि तो जॅकेट पलक हिचा असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. तेव्हा इब्राहिम याच्या रागीट स्वभावामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं आणि अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील त्याची तुलना करण्यात आली होती.
इब्राहिम कधी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
इब्राहिम अली खान देखील लवकरच सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. इब्राहिम बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर स्टारर ‘सरजमीं’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, इब्राहिम ‘दिलेर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेमात इब्राहिम साऊथ सिनेविश्वातील अभिनेत्री श्रीलीला हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
पलक तिवारी – इब्राहिम अली खान
इब्राहिम कायम पलक हिला प्रॉटेक्ट करताना दिसतो. दोघांमधील केमिस्ट्री पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे की, दोघांमध्ये नातं घट्ट आहे. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहते देखील आनंदी झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक आणि इब्राहिम यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
पलक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी का जान’ सिनेमातून पलक चाहत्यांच्या भेटीस आली. सोशल मीडियावर देखील पलक कायम सक्रिय असते. वयाच्या 23 व्या वर्षी पलकने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.