Salman Khan : सलमान खानला विमानतळावर थांबवणाऱ्या ‘त्या’ सीआयएसएफ अधिकाऱ्याला सर्वोत्तम कामगिरीबद्दल बक्षीस

सीआयएसएफच्या वतीनं असं सांगण्यात आलं आहे की त्या अधिकाऱ्याला कोणतीही शिक्षा झालेली नाही, तर त्याचा सन्मान करण्यात आला. (Reward for exemplary professionalism performance to 'that' CISF officer who stopped Salman Khan at the airport)

Salman Khan : सलमान खानला विमानतळावर थांबवणाऱ्या 'त्या' सीआयएसएफ अधिकाऱ्याला सर्वोत्तम कामगिरीबद्दल बक्षीस
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 10:57 AM

मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या नवीन चित्रपट ‘टायगर 3’ च्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाला. रशियाला जाण्यापूर्वी त्याला सीआयएसएफ जवानाने मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी थांबवले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया या सीआयएसएफ जवानाचं प्रचंड कौतुक झालं, या जवानावर कारवाई झाल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र आता सीआयएसएफच्या स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

सीआयएसएफच्या वतीनं असं सांगण्यात आलं आहे की त्या अधिकाऱ्याला कोणतीही शिक्षा झालेली नाही, तर त्याचा सन्मान करण्यात आला. सीआयएसएफकडून नुकतंच एक ट्विट ही माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे संबंधित अधिकाऱ्याला म्हणजेच सोमनाथ मोहंतीला त्याच्या कर्तव्याच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल बक्षीस देण्यात आलं आहे.

नेमकं काय झालं?

वास्तविक, सीआयएसएफ अधिकाऱ्याने सलमानला मुंबई विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी थांबवले. त्याचा एक व्हिडीओ विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सीआयएसएफ अधिकाऱ्याचे कौतुक केले जात आहे. हा जवान सलमानच्या स्टारडमच्या प्रभावाखाली आला नाही आणि त्याला सामान्य नागरिकासारखी वागणूक दिली. या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, सलमानचे चाहते त्याचे विमानतळावर स्वागत करत आहेत आणि फोटोग्राफर त्याचे फोटो काढत आहेत.

पाहा व्हिडीओ 

‘टायगर 3’च्या शूटसाठी रवाना

असे सांगितले जात आहे की, सलमान खान रशियामध्ये सुमारे 2 महिने ‘टायगर 3’ चे शूटिंग करणार आहे. या आधी सलमान खानचे एकाच नावाचे दोन चित्रपट झाले आहेत. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. इमरान हाश्मी या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

सलमान ‘टायगर-3’ चे शुटींग पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतात परत येईल. कारण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ‘बिग बॉस’ टीव्हीवर प्रदर्शित होईल, जो सलमान होस्ट करणार आहे. त्याची डिजिटल आवृत्ती सध्या करण जोहर होस्ट करत आहे. ‘बिग बॉस’ व्यतिरिक्त, सलमान महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Birthday Special : पहिल्याच चित्रपटाद्वारे स्टारडम, कुमार गौरवसोबतच्या अफेअरच्या चर्चेनं झालं करिअर उद्ध्वस्त, वाचा अभिनेत्री विजयता पंडितचा फिल्मी प्रवास

Tv9 Exclusive : पद्मिनी कोल्हापुरेंचे सेकंड इनिंगचे गाणेही लोकप्रिय, दिग्गजांच्या साथीने धमाका लेबलचे गाणे हिट!

छोट्या पडद्यावरून थेट बॉलिवूडमध्ये धडक; जाणून घ्या नुसरत भरूचाची नेटवर्थ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.