sushant singh rajput| तुरुंगात इतर कैद्यांसोबत कशी होती रिया हिची वागणूक; एक महत्त्वाची गोष्ट अखेर समोर आलीच

सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात तुरुंगात राहिलेल्या रिया चक्रवर्ती हिची एक गोष्ट अखेर समोर आलीच... इतर कैद्यांचा निरोप घेताना अभिनेत्रीने केली अशी गोष्ट

sushant singh rajput| तुरुंगात इतर कैद्यांसोबत कशी होती रिया हिची वागणूक; एक महत्त्वाची गोष्ट अखेर समोर आलीच
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 11:10 AM

मुंबई | अभिनेत्री रिया चक्रवर्ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात तुरुंगात होती. सध्या रिया MTV Roadies S19 मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री सोशल मीडियावर आणि माध्यमांपासून दूर होती. पण आता अभिनेत्रीने भूतकाळ विसरून भविष्याकडे उत्तम वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत प्रेम संबंध असल्यामुळे अभिनेत्रीवर सुशांतच्या निधनानंतर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. ज्यामुळे रिया हिला काही काळ तुरुंगात देखील राहवं लागलं होतं. रियावर सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्स देण्याचे आरोप लावण्यात आले होते.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणार रिया हिला भायखाळा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अशात तुरुंगात अभिनेत्रीची वागणूक कशी होती आणि इतर कैद्यांसोबत अभिनेत्री कशी वागत होती… या सर्व गोष्टींचा खुलासा अभिनेत्रीच्या वकील सुधा भारद्वाज यांनी केला आहे. सध्या सर्वत्र रिया आणि तिच्या तुरुंगातील दिवसांची चर्चा सुरु आहे.

रिया हिच्या तुरुंगातील दिवसांबद्दल सांगताना सुधा भारद्वाज म्हणाल्या, ‘तुरुंगातील इतर कैद्यांना रिया हिचा स्वाभाव आवडत होता. कारण ती इतर कैद्यांसोबत मिळून-मिसळून राहत होती. सामान्य व्यक्तींप्रमाणे रिया तुरुंगातील कामे करत होती. जेव्हा रिया हिची सुटका झाली तेव्हा तिला सोडण्यासाठी इतर कैदी गेट पर्यंत आल्या होत्या..’

पुढे सुधा भारद्वाज म्हणाल्या, ‘रिया फक्त कैद्यांसोबत चांगली राहत नव्हती तर, अभिनेत्रीने तिच्याकडे असलेल्या पैशांमधून सर्व कैदी महिलांमध्ये मिठाई वाटली होती..’ दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अडकलेल्या रिया हिला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता.

नुकताच रोडीज शोमध्ये एका मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. यावर रिया हिने देखील सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर घडलेली एक गोष्ट सांगितली. अभिनेत्याच्या निधनानंतर रिया हिला अनेकांच्या अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. रिया हिला अनेक नावे देखील देण्यात आली होती. पण होत असलेल्या विरोधाचा सामना करत रियाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

रिया म्हणाली, ‘मला अनेकांनी अनेक गोष्टी ऐकवल्या. लोक मला खूप काही बोलत होते. पण लोक बोलत आहेत म्हणून मी ती गोष्ट कधीच मान्य करणार नाही.. मी लोकांसाठी माझं आयुष्य का थांबवू? असं मी कधीच करणार नाही…’ सध्या सर्वत्र रिया हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.