सुशांतच्या मृत्यूच्या अनेक वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्रीचा मोठा खुलासा, ‘वेदना, चिंता, दुःख आणि…’

Sushant Singh Rajput: 'वेदना, चिंता, दुःख आणि...', सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री अडकली वादाच्या भोवऱ्यात, अनेक वर्षांनंतर सोडलं मौन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्रीच्या नात्याची चर्चा

सुशांतच्या मृत्यूच्या अनेक वर्षांनंतर 'या' अभिनेत्रीचा मोठा खुलासा, 'वेदना, चिंता, दुःख आणि...'
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 8:07 AM

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील चाहते, कुटुंब किंवा काही सेलिब्रिटी आजही अभिनेत्याला विसरू शकलेले नाहीत. 2020 मध्ये सुशांत याने स्वतःला संपवलं. सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्री आणि एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. अभिनेत्रीला तुरुंगवास देखील भोगावा लागला. सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले. पण आता अनेक वर्षांनंतर रियाने मोठा खुलासा केला आहे.

अनेक संकटं आणि वाईट परिस्थितीचा सामना केल्यानंतर रिया हिने पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. रिया हिने स्वतःचं पॉडकास्ट सुरु केलं आहे. ‘चॅप्टर 2’ नावाने अभिनेत्री पॉडकास्ट सुरु केलं आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये रियाने सुशांतच्या निधनानंतर समोर आलेल्या परिस्थितीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेता आमिर खान याच्यासोबत झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘लहानपणी पाहिलं आहे, वडील जायचे तेव्हा मनात एकच संभावना असायची ती म्हणजे ते पुन्हा येणार नाहीत. मला चॅप्टर – 2 सुरु करण्यासाठी प्रचंड मोठा काळ लागला. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. वेदना, चिंता, पीटीएसडी आणि अनेक गोष्टींचा सामना करत होती…’

‘आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. पण आज मी स्वतःला नव्या प्रकारे अनुभवत आहे. मला आता नव्या लोकांना भेटण्याची इच्छा आहे. आयुष्यात घडलेल्या घटना विसरायला आणि नव्याने नवी सुरुवात करायला मला फार वेळ लागला…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

रिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, रियाला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर पोलिसांनी अटक केली होती. जवळपास 1 महिना अभिनेत्री तुरुंगात होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रिया हिने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. पण त्यानंतर कोणत्याच सिनेमात रिया दिसली नाही. आता अभिनेत्री तिच्या पॉडकास्टमुळे चर्चेत असते.

रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इन्स्टाग्रामवर रिया हिचे 3.5M फॉलोअर्स आहेत तर, अभिनेत्री फक्त 1387 नेटकऱ्यांना फॉलो करते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.