आधी ईडी, नंतर सीबीआय, आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री, तिन्ही तपास यंत्रणांच्या रडारवर रिया चक्रवर्ती

सुशांतच्या मृत्यूवरुन रडारवर असलेल्या रिया चक्रवर्तीच्या भोवती तीन तपास यंत्रणा आहेत (Rhea chakraborty on the radar of three investigation systems).

आधी ईडी, नंतर सीबीआय, आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री, तिन्ही तपास यंत्रणांच्या रडारवर रिया चक्रवर्ती
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 12:20 AM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय तपासाचा गुरुवारी (27 ऑगस्ट) सातवा दिवस होता. मात्र, याप्रकरणी आता फक्त सीबीआयकडूनच तपास सुरु आहे, असं नाही. तर ईडीबरोबरच आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचीही एंट्री झाली आहे. कारण रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगमध्ये ड्रग्जचा अँगल समोर आला आहे. त्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तीन तपास यंत्रणांचा सामना करावा लागत आहे (Rhea chakraborty on the radar of three investigation systems).

सुशांतच्या मृत्यूवरुन रडारवर असलेल्या रिया चक्रवर्तीच्या भोवती तीन तपास यंत्रणा आहेत. आधी ईडी नंतर सीबीआय आली आणि आता ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एंट्री झाली आहे. ईडी तपासात रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरुन ड्रग्ज अँगल समोर आला आहे. गोव्यातील हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याशी MD ड्रग्जबद्दल रियानं चॅटिंगही केली होती. त्यामुळे आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) टीम मुंबईत दाखल झाली.

हेही वाचा : ‘आम्ही एकत्र होतो तोपर्यंत सुशांत नैराश्यात नव्हता’, अंकिता लोखंडेने रिया चक्रवर्तीचा दावा खोडला

गोव्यात हॉटेल व्यावसायिक गौरव आर्याची एनसीबीच्या टीमने चौकशीही केली आहे. रिया आणि गौरव यांच्यात 8 मार्च 2017 रोजी व्हाट्सअ‍ॅपवर ड्रग्जशी संबंधित चॅट झाल्याची माहिती समोर आली आहे. “हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं तर मी जास्त घेतलेले नाहीत. एकदा एमडीएमए घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे एमडी आहे का?”, असा प्रश्न रिया गौरवला चॅटमध्ये विचारत असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. रियानेच सुशांतची हत्या केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे (Rhea chakraborty on the radar of three investigation systems).

सीबीआयने सातव्या दिवशी तब्बल 6 जणांची चौकशी केली आहे. रियाच्या कुटुंबातील सदस्य गुरुवारी पहिल्यांदाच सीबीआयसमोर हजर झाले. सीबीआयने केलेल्या 6 जणांच्या चौकशीमध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती,  सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, कूक केशव बिचनेर, कूर निरज सिंह, सुशांतचा आधीचा अकाऊंटट रजत मेवाती आणि माऊंड ब्लॅक इमारतीच्या सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.

हेही वाचा : Sushant Singh | हो, शवगृहात गेल्यावर पार्थिवाला सॉरी बोलले, पहिल्या मुलाखतीत रियाची रोखठोक भूमिका

दुसरीकडे रियाला मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. एक पोलीस कर्मचारी रियाच्या इमारतीखाली सुरक्षेसाठी तैनात आहे. रियाने एक व्हिडिओ ट्विट करत सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर काही मिनिटांतच मुंबई पोलिसांनी तिला सुरक्षा दिली. तर रियाच्या घरी पोलीस पोहोचल्यानंतर घराखाली एकच गोंधळ झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी पोलिसांना घेरत त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

मनी लॉड्रिंग प्रकरणात तपास करणाऱ्या ईडीने रियाच्या वडिलांची चौकशी केली. रियाच्या वडिलांकडे रियाच्या लॉकरची चावी आणि काही कागदपत्रे आहेत. त्यामुळे इंद्रजित चक्रवर्ती यांना सांताक्रुझच्या वाकोल्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत पोलीस घेऊन आले.

एकाच वेळी तीन यंत्रणांचा वेगवेगवेगळ्या अँगलनं तपास सुरु आहे. तपास जसा खोलवर जातोय, तसे नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे यापुढेही आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.