Bigg Boss साठी ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटींनी कोट्यवधी रुपयांची ऑफर! अनेकांनी नाकारला सलमान खानचा शो
Bigg Boss: काम मिळत नसताना 'या' सेलिब्रिटींना मिळाली 'बिग बॉस'ची ऑफर, कोट्यवधी रुपयांची ऑफर देऊन देखील सेलिब्रिटींना का नाकारला सलमान खान याचा शो? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस' या वादग्रस्त शोची चर्चा...
अभिनेता सलमा खान स्टारर ‘बिग बॉस 18’ रविवारी सुरु होत आहे. शोसाठी चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेली पोहोचली आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते सेलिब्रिटी, सोशल मीडिया स्टार आणि इतर व्यक्ती असतील. याची देखील चर्चा जोर धरत आहे. सांगायचं झालं तर, शी हीट होण्यासाठी निर्माते कायम प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटींच्या शोधात असतात. अशा सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपये देखील ऑफर केले जातात. काही सेलिब्रिटी शो करण्यासाठी तयार होतात. तर काही मात्र मोठ्या शोला आणि कोट्यवधी रुपयांना नकार देतात.
आतापर्यंत अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींना ‘बिग बॉस’ शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. पण काही खासगी किंवा इतर कारणांमुळे सेलिब्रिटींनी ऑफर मान्य केली आहे. या लिस्टमध्ये अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत झालकलेली अभिनेत्री दिशा वकानी…
दिशा वकानी हिला देखील ‘बिग बॉस 18’ साठी विचारण्यात आल्याची चर्चा रंगली होती. निर्मात्यांनी अभिनेत्रीला 65 कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती देखील समोर आली. पण दिशाने नेहमी प्रमाणे ऑफर स्वीकारली नाही. दिशा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना देखील ‘बिग बॉस’ साठी विचारण्यात आलं होतं. एका एपिसोडसाठी राजेश खन्ना यांना 3.5 कोटी रुपये ऑफर करण्यात आले होते. पण राजेश खन्ना यांनी शो करण्यास नकार दिला. पण काही दिवसांनंतर त्यांनी शोमध्ये जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला देखील ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभाही होण्याची संधी मिळाली होती. पण अभिनेत्रीने शोला स्पष्ट नकार दिला. ‘बिग बॉस 17’ शोच्या एका आठवड्यासाठी रिया हिला 35 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती.
प्रसिद्ध कथावाचक डॉक्टर अनिरुद्धआचार्य महाराज यांनी ‘बिग बॉस’मध्ये येण्यासाठी होकार दिला आहे.. अशी माहिती देखील समोर आली होती. त्यांना कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव देखील देण्यात आला. पण माझ्यासाठी पैशांपेक्षा अधिक संस्करांना महत्त्व आहे आणि संस्कारांविरोधात मी जाणार नाही… असं देखील अनिरुद्धआचार्य महाराज म्हणाले होते.