सुशांतच्या वाढदिवशी रिया चक्रवर्ती भावूक, म्हणते, ‘तुझी खूप आठवण येतीये रे’

मुंबई : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याचा आज 36 वा वाढदिवस आहे. आज जरी तो या जगात नसला तरी त्याचे कुटुंबीय आणि त्याचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्याच्या आठवणी जागवत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रियाने तिच्या […]

सुशांतच्या वाढदिवशी रिया चक्रवर्ती भावूक, म्हणते, 'तुझी खूप आठवण येतीये रे'
रिया चक्रवर्ती, सुशांत सिंग राजपूत
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 6:00 PM

मुंबई : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याचा आज 36 वा वाढदिवस आहे. आज जरी तो या जगात नसला तरी त्याचे कुटुंबीय आणि त्याचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्याच्या आठवणी जागवत आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रियाने तिच्या इंस्टाग्रामवर त्याच्यासोबतचा एक थ्रोबॅक व्हिडिओ पोस्ट केला आहे तसंच ‘तुझी खूप आठवण येतीय’ असं म्हणत त्याची कमी अधोरेकित केली आहे.

रिया चक्रवर्तीकडून सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबीय त्याच्या आठवण जागवत आहेत. अनेक वर्षांपासून त्याला डेट करणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिनेही तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्याच्यासोबत छानसा व्हिडीओ पोस्ट करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने व्हिडिओला पिंक फ्लॉइडचे ‘विश यू विअर हिअर’ हे गाणं लावलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी रिया चक्रवर्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला, त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयने केली, ज्यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची तसेच सुशांतच्या काही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. रिया आणि तिचा भाऊ सौविक यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज तपासात अटक केली होती. सुशांत सिंग राजपूत आज जर या जगात असता तर तो ३६ वर्षांचा झाला असता.

सुशांतच्या बहीणीचाही इमोशनल व्हिडीओ

सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल व्हीडिओ शेअर केला आहे. ‘माय गॉड! हा किती सुंदर व्हीडिओ आहे. माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा… आम्ही तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुझ्या स्वप्नांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. सुशांतच्या टीमने हा सुंदर व्हीडिओ बनवला, तुमचे खूप खूप आभार.’ असं श्वेताने या व्हीडिओसाठी कॅप्शन लिहिलं आहे.

सुशांतने अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका साकारल्या

पवित्र रिश्ता या शोमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर, सुशांत सिंग राजपूतने 2013 च्या ‘काई पो चे’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. केदारनाथ, एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी, राबता असे चित्रपट त्याने केले. सुशांत सिंह राजपूतने त्याच्या आयुष्याचील ‘दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट केला.

संबंधित बातम्या

salman khan : नवं वर्ष, नवं गाणं, सलमान खानच्या ‘मैं चला’ गाण्याचा टिझर आऊट

मी नथुराम साकारल्यावर पवारांनी मला विरोध केला नाही, भुजबळ तर माझ्या पाठिशी होते : शरद पोंक्षे

Malaika Arora : डबल मास्क लावला पण ब्रा नाही घातली, नेटकऱ्यांची मलायकावर शेरेबाजी

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...