माणसाचं मनोबल चिरडलं जातं..; सुशांतच्या घटनेवरून आमिरचा रियाला पाठिंबा

सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीवर बरेच आरोप झाले होते. रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. सप्टेंबर 2020 मध्ये सुशांतला ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली रियाला अटक करण्यात आली होती. भायखळा तुरुंगात 28 दिवस राहिल्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये रियाची जामिनावर सुटका झाली होती.

माणसाचं मनोबल चिरडलं जातं..; सुशांतच्या घटनेवरून आमिरचा रियाला पाठिंबा
रिया चक्रवर्ती, आमिर खान, सुशांत सिंह राजपूतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 10:23 AM

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकताच तिचा पॉडकास्ट सुरू केला आहे. ‘चाप्टर 2’ असं तिच्या पॉडकास्टचं नाव असून त्यात अभिनेत्री सुष्मिता सेननंतर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. आमिरसोबतच्या या एपिसोडमध्ये रिया तिच्या आयुष्यातील वाईट काळाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रियावर बरेच आरोप झाले होते. इतकंच नव्हे तर तिला तुरुंगातही राहावं लागलं होतं. रियाच्या भावना ऐकल्यानंतर आमिरने तिचं कौतुक केलं. “तुझ्यासोबत जे घडलं ती एक शोकांतिका होती, असं मी म्हणेन”, असं आमिर म्हणाला.

“त्या घटनेनंतर ज्याप्रकारे तुझं आयुष्य बदललं, तू ज्या पद्धतीने संयम आणि ताकद दाखवलीस, तू तुझ्यातील आशा आणि विश्वास न गमावता लढलीस. या सगळ्या घटनेतून आम्ही बरंच काही शिकू शकतो. अशा घटनेत एखाद्या व्यक्तीचं मनोबल बिघडलं जातं, ते चिरडलं जातं. हा खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याचा दुसरा अध्याय आहे”, असं आमिर रियाला म्हणाला.

हे सुद्धा वाचा

आमिरच्या तोंडून हे कौतुक ऐकल्यानंतर रिया म्हणाली, “माझ्या मते सैन्यात असलेल्या पालकांकडून मिळालेल्या शिकवणीमुळे बराच फरक पडतो. कारण आयुष्य कठीण आहे हे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला लढायला आणि कधीच हार न मानायला शिकवलं जातं. तुम्हाला नेहमीच आशावादी राहायला शिकवलं जातं. तुमच्या डीएनएमध्येच ही गोष्ट असते. तुम्हाला कोणी सहज हरवू शकत नाही.” रियाने त्या संपूर्ण घटनेदरम्यान विलक्षण धैर्य दाखवलं आणि त्याबद्दल तिला अभिमान असायला हवा, अशा शब्दांत आमिरने तिची प्रशंसा केली.

या संवादादरम्यान रियाने नैराश्याचा सामना कसा केला, त्याविषयीही सांगितलं. “चाप्टर 2 सुरू करण्यासाठी मला खूप वेळ लागला, कारण एकाच वेळी मी बऱ्याच समस्यांचा सामना करत होते. दु:ख, नैराश्य, राग, PTSD (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर) अशी मोठी यादीच होती. या सगळ्यात जवळची व्यक्ती गमावल्याचा शोकही होता. एखाद्या व्यक्तीशी बोलताना अचानक मी त्या दु:खात बुडून जायचे. पण हळूहळू मी त्यातून बाहेर पडलेय. आता कुठेतरी मला लोकांना भेटावंसं वाटतं. अखेर माझ्या आयुष्यात सुर्योदय होतोय असं मला वाटतंय. मी माझा स्वत:चा पॉडकास्ट सुरू करण्यामागचं मोठं कारण म्हणजे त्या संपूर्ण घटनेदरम्यान मीडियाने माझा खूप वाईट प्रचार केला. मी काही मुलाखतीसुद्धा दिल्या, पण मला त्यातून वाईटच अनुभव आला. एका व्यक्तीने मला त्याच्या पॉडकास्टमध्ये बोलावलं होतं. मी पत्रकारासारखे प्रश्न विचारणार नाही, आपण मित्रासारखे गप्पा मारू, असं तो म्हणाला होता. पण ती मुलाखत आणखीनच वाईट होती. तेव्हा मी विचार केला की स्वत:चाच पॉडकास्ट सुरू करावा.”

रियाचं हे बोलणं ऐकून आमिर तिला आधार देत म्हणाला, “लोकांना तुझ्याबद्दल चुकीची माहिती दिली गेली, म्हणून काही लोक आजसुद्धा तुला चुकीचं समजतात. पण त्यांना हळूहळू सत्य कळेल अशी माझी आशा आहे.” त्या कठीण काळात आमिरने काही डॉक्युमेंट्री बघण्याचा सल्ला देऊन रियाला तिचा राग शांत करण्यास मदत केली होती. याचाही उल्लेख रियाने केला. “ते सर्व माझ्यासोबत घडत असताना माझ्या मनात खूप राग होता. मी नेहमीच चिडचिड करायची. तेव्हा तू मला रुबरू रोशनी नावाची डॉक्युमेंट्री पाहण्याचा सल्ला दिला होतास. त्यात लोकांनी माझ्यापेक्षाही वाईट परिस्थितीचा सामना कशा पद्धतीने केला ते पाहून माझ्यातील बऱ्याच गोष्टी बदलल्या”, असं तिने सांगितलं.

'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.